शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचा दिमाखदार विजय

By admin | Updated: May 2, 2015 00:11 IST

दिल्ली डेअरडेव्हिल्सने पंजाब संघाचा डाव ८ बाद ११८ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १३.५ षटकांत एक गडी गमावत पूर्ण केल्या.

दिल्ली डेअरडेव्हिल्सने पंजाब संघाचा डाव ८ बाद ११८ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १३.५ षटकांत एक गडी गमावत पूर्ण केल्या. त्याआधी, नॅथन कोल्टर नाईल व दुखापतीनंतर पुनरागमन करणारा अनुभवी झहीर खान यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा डाव ८ बाद ११८ धावांत रोखला. कोल्टर नाईलने २० धावांच्या मोबदल्यात ४ तर झहीरने १७ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. आॅफ स्पिनर कर्णधार जेपी ड्युुमिनीने किफायती गोलंदाजी करताना ४ षटकांत १५ धावांमध्ये एक बळी घेतला. यजमान संघाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पाहुण्या संघाच्या डावात केवळ ९ चौकार व ३ षटाकरांची नोंद झाली. डेव्हिड मिलर (४२) आणि अक्षर पटेल (२२) यांनी सातव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केल्यामुळे पंजाब संघाला सन्मानजनक धावसंख्येची मजल मारता आली. मिलरने ४२ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व १ षटकार ठोकला तर अक्षरच्या २६ चेंडूंच्या खेळीमध्ये एका षटकाराचा समावेश आहे. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त कर्णधार जॉर्ज बेली (१८) दुहेरी धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला. ड्युमिनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या आठव्या पर्वात पहिला सामना खेळणाऱ्या झहीरने शानदार सुरुवात करताना सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर वीरेंद्र सेहवागला (१) माघारी परतवले. त्यानंतर ड्युमिनीने पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवर शॉर्न मार्शला (५) तंबूचा मार्ग दाखवित दिल्ली संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतरच्या षटकात झहीरने सलामीवीर मनन व्होराला (१) यष्टिरक्षक जाधवकडे झेल देण्यास भाग पाडले तर कोल्टर नाईलने रिद्धिमान साहाचा (०३) अडथळा दूर केला. त्यावेळी पंजाबची ४ बाद १० अशी अवस्था झाली होती. लेग स्पिनर अमित मिश्राने त्यानंतर बेलीला (१८) बाद करीत पंजाबला पाचवा धक्का दिला. तिसारा परेराला (३) मोठी खेळी करता आली नाही. त्याला कोल्टर नाईलने बाद केले. (वृत्तसंस्था)