दिल्लीचा हैदराबादवर दिमाखदार विजय

By Admin | Updated: May 12, 2016 23:45 IST2016-05-12T23:45:45+5:302016-05-12T23:45:45+5:30

दिल्ली डेअरडेव्हिल्सनं सनरायझर्स हैदराबादवर शानदार विजय मिळवला आहे.

Delhi's favorite on Delhi | दिल्लीचा हैदराबादवर दिमाखदार विजय

दिल्लीचा हैदराबादवर दिमाखदार विजय

 ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 12-दिल्ली डेअरडेव्हिल्सनं सनरायझर्स हैदराबादवर शानदार विजय मिळवला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सनं 147 धावांचा पाठलाग करताना निर्धारित 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 152 धाव्या केल्या आहेत. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून डी कॉकनं धडाकेबाज खेळी करताना 31 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 44 धावा केल्यात. तर अग्रवाल 10, नायर 20 धावा काढून तंबूत परतले आहेत. सॅमसन आणि पंतनं नाबाद खेळीच्या जोरावर दिल्लीला विजय मिळवून दिला आहे. सॅमसननं 2 षटकारांसह 34 धावा केल्या. तर पंतनं 2 चौकार आणि 3 षटकारांसह 39 धावा करून संघाला विजय मिळवून दिला आहे.
 
 याआधी सनरायझर्स हैदराबाद दिल्ली डेअरडेव्हिससमोर विजयासाठी 147 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सनरायझर्स हैदराबादनं निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावा केल्या आहेत.
दिल्ली डेअरडेव्हिल्सनं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कॅप्टन वॉर्नरनं फलंदाजीच्या जोरावर 30 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारांची खेळी करत 46 धावांची मजल मारली आहे. तर धवननंही 3 चौकारांसह 34 धावा काढून संघाच्या धावसंख्येत भर टाकली आहे.
विल्यमसन 27, युवराज सिंग 8, हुडा 10, बी कुमार 1 धावा केल्यात. तर हेनरिक भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. सरण आणि नेहरा नाबाद खेळत शेवटपर्यंत मैदानावर टिकून होते. तर दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून एन. एम नाइलनं उत्कृष्ट गोलंदाजी करत हुडा आणि ओझाला तंबूत पाठवलं आहे. मिश्रानंही धवन आणि युवराज सिंगला बाद करत सनरायझर्स हैदराबादला 146 धावांवर रोखलं आहे. 
 
 
 
 
 
 
 

Web Title: Delhi's favorite on Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.