दिल्ली वेवरायडर्सची वॉरिअर्सवर मात
By Admin | Updated: February 18, 2017 01:01 IST2017-02-18T01:01:41+5:302017-02-18T01:01:41+5:30
हॉकी इंडिया लीग (एचसीएल)मध्ये येथे झालेल्या सामन्यात दिल्ली वेवरायडर्सने जे पी पंजाब वॉरियर्सला ६-१ असे एकतर्फी हरवून

दिल्ली वेवरायडर्सची वॉरिअर्सवर मात
दिल्ली : हॉकी इंडिया लीग (एचसीएल)मध्ये येथे झालेल्या सामन्यात दिल्ली वेवरायडर्सने जे पी पंजाब वॉरियर्सला ६-१ असे एकतर्फी हरवून सेमीफायनलमध्ये पोहचण्याची आपली आशा जिवंत ठेवली.
वेवरायडर्सचा हा आठ सामन्यातील तिसरा विजय आहे. त्याचे आता २१ गुण झाले आहेत. यामुळे आता हा संघ तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.दिल्लीने सुरुवातीलाच सामन्यात दबाव निर्माण केला याचा त्यांना फायदा मिळाला. रीड रोसने चौथ्या मिनिटाला पहिला गोल केला.