नाशिकच्या मोनिकाची दिल्ली सर
By Admin | Updated: February 26, 2017 23:44 IST2017-02-26T23:44:29+5:302017-02-26T23:44:29+5:30
दुसऱ्या आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स नवी दिल्ली मॅरेथॉनमध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकाविले.

नाशिकच्या मोनिकाची दिल्ली सर
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकपटू टी गोपी आणि नाशिकची कन्या मोनिका आथरे यांनी रविवारी दुसऱ्या आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स नवी दिल्ली मॅरेथॉनमध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि इथोपियाचा महान धावपटू हेले गॅब्रेसिलासी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ झाला.
गोपीने येथे पहिल्यांदा पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना २ तास १५ मिनिटे आणि ३७ सेकंदांचा वेळ घेत विजय नोंदविला. आॅगस्ट महिन्यात लंडनमध्ये होणाऱ्या
विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपसाठी गोपीने यापूर्वीच पात्रता मिळविली आहे.
सेनादलाचा बहादूरसिंग धोनी २ तास १६ मिनिटे ९ सेकंदांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. टी. एच. संजीतने ४२.१९५ कि.मी.चे अंतर दोन तास १७ मिनिटे २0 सेकंदांत पूर्ण करीत तिसरे स्थान मिळविले.
महिला गटात नाशिकच्या मोनिका आथरे हिने २ तास ३९ मिनिटे आणि 0८ सेकंदांचा वेळ नोंदवीत आपले पहिले विजेतेपद पटकाविले. ्र्र्रपरभणीच्या ज्योती गवते (२ तास ५३ मिनिटे ४८ सेकंद) आणि रंजन कुमारी (३ तास ८ मिनिटे ४ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला. (वृत्तसंस्था)
>जी लक्ष्मण विजयी
हाफ मॅरेथॉनमध्ये जी लक्ष्मण याने १ तास ४ मिनिटे आणि २९ सेकंदांचा वेळ नोंदवीत पहिला क्रमांक मिळविला. मानसिंगचा पहिला क्रमांक दहा सेकंदांनी हुकला. खेताराम तिसऱ्या स्थानावर आला. महिला गटात मंजू यादवने अव्वल स्थान पटकाविले. तिने १ तास २५ मिनिटे ३४ सेकंदांची वेळ नोंदविली.