दिल्लीने लक्ष्याचा पाठलाग करावा

By Admin | Updated: April 19, 2017 01:49 IST2017-04-19T01:49:14+5:302017-04-19T01:49:14+5:30

सनरायजर्स हैदराबाद संघाला फलंदाजांकडून मोठ्या खेळीची गरज आहे. डेव्हिड वॉर्नरने लढवय्या बाणा दाखविला असला तरी, गत चॅम्पियन संघाला दिमाखदारपणे आगेकूच करायची

Delhi should pursue the target | दिल्लीने लक्ष्याचा पाठलाग करावा

दिल्लीने लक्ष्याचा पाठलाग करावा

रवी शास्त्री लिहितात...
सनरायजर्स हैदराबाद संघाला फलंदाजांकडून मोठ्या खेळीची गरज आहे. डेव्हिड वॉर्नरने लढवय्या बाणा दाखविला असला तरी, गत चॅम्पियन संघाला दिमाखदारपणे आगेकूच करायची असेल तर युवराज सिंग व शिखर धवन यांना कामगिरीत सातत्य राखावे लागेल. म्हातारा झालेला सिंह शिकारीला निघालेला आहे, हे दाखविण्याची गरज नाही. मोईसेस हेन्रिक्सची कामगिरी समाधानकारक आहे. पण अडचणीच्या स्थितीत विश्वास व्यक्त करता येईल, अशी ओळख त्याने निर्माण केलेली नाही. अन्य खेळाडू एखाद्या वेळी छाप सोडण्यात यशस्वी ठरले आहेत. हे सर्व लक्षण लक्ष्य देण्यापेक्षा लक्ष्याचा पाठलाग करण्यास पसंती देणाऱ्या संघाचे आहे.
रात्री होणाऱ्या लढतीत लक्ष्याचा पाठलाग करणे चांगला पर्याय ठरतो. अशास्थितीत जास्तीत जास्त संघ प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करतात. कृत्रिम प्रकाशझोतात चेंडू बॅटवर चांगला येतो, पण दिल्ली डेअरडेव्हिल्सने मात्र दुसरा पर्याय निवडला. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाचा कर्णधार झहीर खानने दडपणाखाली लक्ष्याचा पाठलाग करण्यापेक्षा प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याने फलंदाजांमध्ये लक्ष्याचा बचाव करण्याचा विश्वास निर्माण केला आहे. माझ्या मते, हैदराबाद विरुद्धच्या लढतीत दिल्लीने आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून लक्ष्याचा पाठलाग करण्यास पसंती द्यायला हवी. उप्पल स्टेडियमची खेळपट्टी नंतर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अनुकूल राहील.
हैदराबाद संघ आपल्या गोलंदाजीबाबत साशंक आहे. भुवी व राशिद खान फॉर्मात असल्याचे दिसून येत आहे. पण मुस्तफिजूर रहमान व बरिंदर सरण यांचे पुनरागमन अपेक्षेनुसार झाले नाही. आशिष नेहरच्या
गोलंदाजीवरही धावा फटकावल्या गेल्या. पाच सामन्यांमध्ये युवराजने अद्याप एकही चेंडू टाकलेला नाही. युवराजचा गोलंदाजीमध्ये वापर होणे अपेक्षित आहे. या सामन्याच्या निमित्ताने पंत व राशिद यांची जुगलबंदी अनुभवण्याची संधी मिळेल. संजू सॅमसनविरुद्ध भुवी कशी गोलंदाजी करतो, याबाबत उत्सुकता आहे.
भुवीने आतापर्यंत या स्पर्धेत १५ बळी घेतले आहेत. केन विलियम्सनला हैदराबादतर्फे आपली पहिली लढत खेळण्याची संधी मिळते का, याबाबतही उत्सुकता आहे. दिल्लीची गोलंदाजी बघितल्यानंतर विलियम्सनला संधी देण्याची वेळ आलेली आहे, असे वाटते. (टीसीएम)

Web Title: Delhi should pursue the target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.