दिल्ली - पंजाब आज समोरासमोर

By Admin | Updated: April 30, 2017 02:13 IST2017-04-30T02:13:37+5:302017-04-30T02:13:37+5:30

सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेले दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्स इलेव्हन पंजाब या संघांदरम्यान उद्या (रविवारी) लढत होत आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यास उभय संघांना विजय आवश्यक आहे.

Delhi - Punjab face to face today | दिल्ली - पंजाब आज समोरासमोर

दिल्ली - पंजाब आज समोरासमोर

मोहाली : सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेले दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्स इलेव्हन पंजाब या संघांदरम्यान उद्या (रविवारी) लढत होत आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यास उभय संघांना विजय आवश्यक आहे.
आठ सामन्यांत केवळ तीन विजय मिळविणारा पंजाब संघ सहाव्या, तर दिल्ली संघ सात सामन्यांत दोन विजयांसह सर्वांत तळाच्या स्थानावर आहे. दिल्ली संघाचा रविवारच्या लढतीत पराभव झाला, तर प्लेआॅफमध्ये स्थान मिळविण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात येतील. त्यातुलनेत पंजाबची स्थिती थोडी चांगली आहे. पण या लढतीत पराभव स्वीकारावा लागला, तर प्लेआॅफचा त्यांचा मार्ग खडतर होईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Delhi - Punjab face to face today