दिल्लीचा पंजाबवर ९ गडी राखून विजय

By Admin | Updated: May 1, 2015 19:01 IST2015-05-01T18:32:10+5:302015-05-01T19:01:09+5:30

श्रेयस अय्यर (५३) व मयांक अगरवाल (नाबाद ५२) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने पंजाबवर ९ गडी राखून विजय मिळवला.

Delhi beat Punjab by 9 wickets | दिल्लीचा पंजाबवर ९ गडी राखून विजय

दिल्लीचा पंजाबवर ९ गडी राखून विजय

>ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. १ - श्रेयस अय्यर (५३) व मयांक अगरवाल (नाबाद ५२) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने पंजाबवर ९ गडी राखून विजय मिळवला. अवघ्या १३.१ षटकांत दिल्लीने ११९ धावांचे लक्ष्य गाठण्यात यश मिळवले. श्रेयस अय्यर ५३ धावांवर बाद झाल्यानंतर मयांक व सौरभ तिवारीने (नाबाद ५) दिल्लीला सामना जिंकून दिला. पंजाबतर्फे शार्दुल ठाकूरने १ बळी टिपला.
तत्पूर्वी डेव्हिड मिलर (४२) व अक्षर पटेल (२२) या दोघांच्या खेळीमुले पंजाबने दिल्लीसमोर जिंकण्यासाठी ११९ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा दिल्लीचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पहिल्या षटकांतच सेहवाग (१) व नंतर मार्श (५) धावांवर बाद झाल्याने पंजाबला मोठे धक्के बसले. त्यानंतरही व्होरा (१) व सहा (३) हेही पटापट तंबूत परतल्याने पंजाबची अवस्था ४ बाद १० अशी झाली होती. मात्र त्यानंतर  आलेल्या मिलरने (४२) चांगली खेळी करत पंजाबाचा डाव सावरला, त्याला अक्षर पटलेचीही चांगली साथ मिळाली.
दिल्लीतर्फे नॅथन कॉल्टरने ४ , झहीर खानने २ आणि ड्युमिनी व मिश्राने प्रत्येकी १ बळी टिपला. 

Web Title: Delhi beat Punjab by 9 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.