अनुराग ठाकूर, अजय शिर्के यांना हटवा
By Admin | Updated: September 29, 2016 06:30 IST2016-09-29T06:30:34+5:302016-09-29T06:30:34+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळात पारदर्शकता आणण्यासाठी सुचविण्यात आलेल्या शिफारशींकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने सर्वोच्च

अनुराग ठाकूर, अजय शिर्के यांना हटवा
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळात पारदर्शकता आणण्यासाठी सुचविण्यात आलेल्या शिफारशींकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयामध्ये अहवाल सादर केला. लोढा समितीने बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर, सचिव अजय शिर्के यांच्यासह इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयची कानउघाडणी करताना ‘वेळीच सुधारा करा, अन्यथा आम्ही सुधरवू’ असे फटकारले.
सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर, न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे समितीने दिलेल्या अहवालात क्रिकेट प्रशासक व क्रिकेट संस्थांच्या अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी केली. बीसीसीआय व त्यांचे पदाधिकारी शिफारशींचे पालन करीत नाहीत. न्यायालय व समिती सदस्यांच्या अधिकारांना कमी लेखतात, असे समितीने म्हटले. ई-मेल व अन्य मार्गाने केलेल्या संपर्काला बीसीसीआय उत्तर देत नसून, न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष
करीत आहे, असेही समितीच्या वकिलाने सांगितले. (वृत्तसंस्था)