‘डिव्हिलियर्सला लवकर बाद करणे होता टर्निंग पॉर्इंट’
By Admin | Updated: April 24, 2015 09:29 IST2015-04-24T00:43:01+5:302015-04-24T09:29:30+5:30
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स याला लवकर बाद करणे हा आमच्या संघासाठी टर्निंग पॉईंट होता, असे मत चेन्नई सुपरकिंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने

‘डिव्हिलियर्सला लवकर बाद करणे होता टर्निंग पॉर्इंट’
बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स याला लवकर बाद करणे हा आमच्या संघासाठी टर्निंग पॉईंट होता, असे मत चेन्नई सुपरकिंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने व्यक्त केले. बुधवारी चेन्नई सुपरकिंग्ज संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसंघाचा २७ धावांनी पराभव केला.
१८२ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ २० षटकांत ८ बाद १५४ पर्यंत मजल मारूशकला. सामन्यानंतर रैना म्हणाला, ‘‘जेव्हा विराट फलंदाजी करीत होता, तेव्हा तो त्यांच्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल, असे मला वाटले होते; परंतु डिव्हिलियर्स बाद झाला तेव्हा आम्हाला आम्ही जिंकू असे वाटले.’’ रैनाने गेलला बाहेर ठेवण्याविषयी आश्चर्य व्यक्त केले. त्याने विजयाचे श्रेय गोलंदाजांना आणि विशेषत: आशिष नेहराला दिले.
तो म्हणाला, ‘‘गेल न खेळल्याने मला आश्चर्य वाटले होते; परंतु विराट सकारात्मक विचार करतो आणि डिव्हिलियर्सनेदेखील दक्षिण आफ्रिकेसाठी चांगल्या खेळी केल्या आहेत. नेहरा तो गेल्या १५ वर्षांपासून भारतीय क्रिकेटसाठी चांगली कामगिरी करीत आहे आणि चेन्नईसाठीही त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. आमच्याकडे सध्या सर्वांत अनुभवी गोलंदाज म्हणून तो आहे आणि केव्हा आक्रमक व्हावे हे त्याला माहीत आहे.