आफ्रिकेचा १८४ धावांत धुव्वा, भारताकडे १७ धावांची आघाडी
By Admin | Updated: November 6, 2015 13:40 IST2015-11-06T11:51:58+5:302015-11-06T13:40:13+5:30
आर अश्विनच्या फिरकीची जादू चालल्याने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १८४ धावांत आटोपला असून पहिल्या डावात ते भारतापेक्षा १७ धावांनी पिछाडीवर आहेत. आफ्रिकेला गुंडाळले असून आफ्रिकेने ९ गडी गमावत १७९ धावा केल्या आहेत.

आफ्रिकेचा १८४ धावांत धुव्वा, भारताकडे १७ धावांची आघाडी
ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. ६ - आर अश्विनच्या फिरकीची जादू चालल्याने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १८४ धावांत आटोपला असून पहिल्या डावात ते भारतापेक्षा १७ धावांनी पिछाडीवर आहेत. बराच वेळ टिकून राहिलेला एबी डी व्हिलियर्स ६३ धावांवर बाद झाल्यानंतरच आफ्रिकेच्या आशा संपुष्टात आल्या आणि इम्रान ताहीरला बाद करत अश्विनने आफ्रिकेचा डाव संपुष्टात आणला.
मोहाली कसोटीच्या दुस-या दिवशी आफ्रिकेने २ बाद २८ वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. डिन एल्गार आणि हाशिम आमला या जोडीने सावध सुरुवात करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एल्गार ३७ धावांवर असताना अश्विनच्या फिरकीवर तो झेलबाद झाला. तर अश्विनने हाशिम आमलाचा अडसर दूर करत भारताला मोठे यश मिळवून दिले. हामला ४३ धावांवर बाद झाला. यानंतर डेन विलासला स्वस्तात माघारी पाठवण्यात अश्विनला यश आले. लंचपर्यंत आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता.
त्यानंतरहीआफ्रिकेची पडझड सुरूच होती, मात्र एबी डीव्हिलयर्स खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर आफ्रिकेने दीडशे धावांचा टप्पा ओलांडला. एकीकडे अश्विनच्या गोलंदाजीमुळे आफ्रिकेचे फलंदाज बेजार झालेले असतानाच जडेजा आणि मिश्रानेही पटापट बळी मिळवल्याने आफ्रिकेचा डाव १८४ धावांत संपुष्टात आला आणि भारतालाडे १७ धावांची आघाडी मिळाली.