दीपिका, लक्ष्मीराणी अंतिम १६मध्ये

By Admin | Updated: July 30, 2015 00:58 IST2015-07-30T00:58:29+5:302015-07-30T00:58:29+5:30

कोपेनहेगन (डेन्मार्क) येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात महिला गटात भारताच्या अव्वल तिरंदाजपटू दीपिका कुमारी आणि लक्ष्मीराणी

Deepika, Lakshmirani in the last 16 | दीपिका, लक्ष्मीराणी अंतिम १६मध्ये

दीपिका, लक्ष्मीराणी अंतिम १६मध्ये

नवी दिल्ली : कोपेनहेगन (डेन्मार्क) येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात महिला गटात भारताच्या अव्वल तिरंदाजपटू दीपिका कुमारी आणि लक्ष्मीराणी माझी यांनी अंतिम १६मध्ये आपली जागा निश्चित केली. दुसरीकडे रिमिल बुरीहीला पहिल्याच फेरीत पराभव पत्कारावा लागला. माजी नंबर १ खेळाडू दीपिका आघाडीच्या ८मध्ये असल्यामुळे तिला थेट अंतिम १६मध्ये प्रवेश देण्यात आला. लक्ष्मीराणीने २४ आणि ४८च्या राऊंडमध्ये चांगलीच झुंज द्यावी लागली. ४८च्या राऊंडमध्ये लक्ष्मीराणीने फ्रान्सच्या थॉमस सोलेमनला ६-५ ने पराभूत केले. त्यानंतर २४च्या राऊंडमध्ये लक्ष्मीराणीने इटलीच्या नतालिया वालियाला पहिल्या दोन सेटमध्ये २६-१७, २८-२६ असे पराभूत केले. तिसऱ्या सेटमध्ये २६-२६ अशी बरोबरी राहिली. चौथ्या व पाचव्या सेटमध्ये तिला २६-२७, २७-२८ असा पराभव पत्कारावा लागला. परंतु टायब्रेकरमध्ये तिने ९-७ असा विजय नोंदवत ६-५ अशी गेम जिंकली.(वृत्तसंस्था)

Web Title: Deepika, Lakshmirani in the last 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.