दीपाला पदकाची थोडक्यात हुलकावणी
By Admin | Updated: August 15, 2016 00:39 IST2016-08-15T00:14:32+5:302016-08-15T00:39:56+5:30
दीपा कर्माकरचे पदक 0.150 अंशांनी हुकले.

दीपाला पदकाची थोडक्यात हुलकावणी
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 15 - पदकासाठी जिच्याकडून आज अवघ्या भारताची अपेक्षा होती. त्या दीपा कर्माकरचे पदक 0.150 अंशांनी हुकले. दीपा कर्माकरनं आतापर्यंत 15.066 गुणांची कमाई केली आहे. जिम्नॅस्टिकच्या व्हॉल्ट प्रकारात फायनलमध्ये गेलेली दीपा चौथ्या स्थानी राहिली. अमेरिकेच्या सिमोन बाइल्सने सुवर्णपदक पटकावले. स्वित्झर्लंडच्या गिरुलिया स्टीनग्रुबेर हिने 15.216 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला; तर दीपा कर्माकर एकंदर 15.066 गुण नोंदवू शकली. सिमॉनने 15.966 गुणांसह सुवर्ण; तर मारियाने 15.253 गुणांसह रौप्यपदक जिंकले.
मात्र दीपाच्या यशावर तिच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे. याआधी ती आठव्या स्थानावर होती. मात्र आता ती चौथ्या स्थानावर आहे, मी तिच्या यशानं समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया दीपा कर्माकरच्या वडिलांची दिली आहे.
Earlier she was on 8th position and now on fourth, so I am happy and satisfied: Father of Dipa Karmakar pic.twitter.com/z2AyUpfhjs
— ANI (@ANI_news) August 14, 2016