दीपा, जीतू राय यांची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस ?
By Admin | Updated: August 17, 2016 16:51 IST2016-08-17T16:51:34+5:302016-08-17T16:51:34+5:30
दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांची यावर्षीच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येऊ शकते.

दीपा, जीतू राय यांची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - रिओ ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टीक्सच्या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करणारी दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांची यावर्षीच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येऊ शकते. राजीव गांधी खेल रत्न भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो.
वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. जिमनॅस्टीक्समध्ये ५२ वर्षात पात्र ठरलेली दीपा पहिली भारतीय जिमनॅस्ट होती. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये दीपाने चमकदार कामगिरी केली. अवघ्या ०.१५० गुणांच्या फरकाने तिचे कांस्यपदक हुकले.
आपल्या खेळाने दीपाने सर्वांची मने जिंकून घेतली. प्रादूनोवा वॉल्ट या सर्वात धोकादायक प्रकारात तीने आपले प्रावीण्य सिद्ध केले. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जीतू राय जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये जीतूनेही अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र त्याला पदकावर नेम साधता आला नाही.