दीपा तू लाखो मन जिंकलीस, तुझा अभिमान वाटतो - सचिन तेंडुलकर
By Admin | Updated: August 15, 2016 15:41 IST2016-08-15T15:41:44+5:302016-08-15T15:41:44+5:30
अवघ्या ०.१५० गुणांच्या फरकामुळे ऑलिम्पिक पदकापासून वंचित रहावे लागलेल्या दीपा कर्माकरचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे.

दीपा तू लाखो मन जिंकलीस, तुझा अभिमान वाटतो - सचिन तेंडुलकर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - अवघ्या ०.१५० गुणांच्या फरकामुळे ऑलिम्पिक पदकापासून वंचित रहावे लागलेल्या दीपा कर्माकरचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे. जिंकण-हरण हा खेळाचा भाग असतो. तू लाखो मन जिंकली आहेस. तू जे मिळवलसं त्यावर आज संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे अशा शब्दात सचिनने दीपाचे कौतुक केले आहे.
रविवारी संपूर्ण देशाचे दीपाच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिले होते. जिमनॅस्टीक्समधील प्रादुनोवा वॉल्टच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या दीपानेही सर्वोत्तम प्रदर्शन करुन देशवासियांना निराश केले नाही. फक्त ०.१५० गुणांच्या फरकामुळे तिचे कांस्यपदक हुकल्यामुळे सर्वांना वाईट वाटले.
दीपाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. कारण भारतात दुर्लक्षित असलेल्या या खेळासाठी कोणत्याही सोयी-सुविधा नसताना दीपाने जागतिक स्तरावर आपला यशस्वी ठसा उमटवला. जिमनॅस्टीक्समध्ये प्रादुनोवा वॉल्ट सर्वात धोकादायक प्रकार म्हणून ओळखला जातो. तिथे केलेली एखादी छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. अशा सर्व प्रतिकुलतेवर मात करत ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानापर्यंत मजल मारणे खरोखर कौतुकास्पद आहे.