दीपाकडून भारतीयांना अपेक्षा
By Admin | Updated: August 7, 2016 03:47 IST2016-08-07T03:47:25+5:302016-08-07T03:47:25+5:30
५२ वर्षांनंतर आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्ट दीपा करमाकर रविवारी या स्पर्धेत एकमेव देशाच्या प्रतिनिधीच्या रूपात

दीपाकडून भारतीयांना अपेक्षा
रिओ : ५२ वर्षांनंतर आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्ट दीपा करमाकर रविवारी या स्पर्धेत एकमेव देशाच्या प्रतिनिधीच्या रूपात भारताचे आव्हान सादर करण्यास सज्ज झाली आहे.
१९६४ नंतर दीपा ही आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारी देशातील पहिली महिला जिम्नॅस्ट आहे. कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असल्यास खेळाच्या या महाकुंभात भरीव कामगिरी करावी लागेल, याची जाणीवदेखील दीपाला आहे.
जिम्नॅस्टिकमध्ये एकमेव भारतीय म्हणून खेळणार असल्यामुळे हे माझ्यासाठी कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नसल्याचे दीपाने रिओच्या आॅलिम्पिकआधी म्हटले होते. पूर्वोत्तर भागातील असणाऱ्या दीपाने कठोर परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आॅलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे. बालपणीच पाय चपटे असल्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.