डेक्कन क्लबचे एकतर्फी विजेतेपद

By Admin | Updated: June 7, 2015 00:44 IST2015-06-07T00:44:41+5:302015-06-07T00:44:41+5:30

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित दोनदिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पूना क्लबवर मात

Deccan Club's One-Day Championship | डेक्कन क्लबचे एकतर्फी विजेतेपद

डेक्कन क्लबचे एकतर्फी विजेतेपद

मुंंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित दोनदिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पूना क्लबवर मात करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. राहुल त्रिपाठीची (४ बळी) भेदक गोलंदाजी व स्वप्नील गुगळेच्या (८५) फलंदाजीच्या बळावर डेक्कनचा विजय साकार झाला. डेक्कनने पूना क्लबला पहिल्या डावांत ७८.३ षटकांत २४२ धावांत गुंडाळले होते. यानंतर डेक्कनने ६५.१ षटकांत ६ बाद २४३ धावा केल्या. स्वप्नील गुगळेने शानदार ८५ धावा फटकावताना संघाला सावरले. त्याचवेळी अक्षय जाधव (नाबाद ४०), शुभम नागवडे (३७) व राहुल त्रिपाठी (२४) यांनी देखील मोक्याच्यावेळी फटकेबाजी करताना त्याला सुरेख साथ दिली. शुभम रांजणे (३), पियुश साळवी (२) यांनी चांगला मारा केला.

Web Title: Deccan Club's One-Day Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.