डेक्कन

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:12+5:302015-02-15T22:36:12+5:30

डेक्कन क्रोनिकलचा चेअरमन सीबीआयच्या जाळ्यात

Deccan | डेक्कन

डेक्कन

क्कन क्रोनिकलचा चेअरमन सीबीआयच्या जाळ्यात
नवी दिल्ली : हैदरबादचे इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रोनिकलचे चेअरमन टी व्येंकटरमन रेड्डी यांना शनिवारी सीबीआयने अटक केली. त्यांच्यावर कॅनरा बँकेतून ३५७ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करताना टाळाटाळ केल्याचा आरोप आहेे.
कॅनरा बँकेतर्फे डेक्कन क्रोनिकल होल्डिंग्ज लिमिटेवर जुलै २०१३ च्या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती. सीबीआयने स्पष्ट केले की, बँकेने रेड्डी यांच्याविरुद्ध घोटाळ्याची तक्रार दाखल केली आहे. कंपनीने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास त्यांनी टाळाटाळ केली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सीबीआयने रेड्डी यांची चौकशी केली. कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी. विनायक रेड्डी यांनाही अटक करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रानी सांगितले.

Web Title: Deccan