शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

डिव्हिलिअर्स पुन्हा एकदा बेस्ट, वनडे क्रमवारीत ठरला अव्वल

By admin | Updated: March 10, 2017 16:54 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धडाडीचा फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने अव्वल स्थानावर कब्जा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धडाडीचा फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीच्या बळावर त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं. या मालिकेत त्याने 262 धावा केल्या होत्या त्यामध्ये वेलिंगटन वनडेमध्ये केलेल्या 85 धावांच्या अप्रतिम खेळीचाही समावेश आहे.  तर भारतीय कर्णधार विराट कोहली तिस-या स्थानावर कायम आहे. 
 
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला डिव्हिलिअर्सच्या चांगल्या कामगिरीचा फटका बसला. वॉर्नरची दुस-या स्थानावर पिछेहाट झाली आहे. डिव्हिलिअर्सला 875 रेटिंग असून तिस-या स्थानावरील कोहलीच्या तो 23 गुणांनी पुढे आहे तर वॉर्नरपेक्षा 4 गुणांनी पुढे आहे. 
या क्रमवारीत भारताचा रोहित शर्मा (12) आणि महेंद्र सिंह धोनी (13) आपल्या आधीच्या स्थानावर कायम आहेत. 
आयसीसी क्रमवारीत अश्विन-जडेजाने रचला इतिहास, दोघंही अव्वल-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताच्या फिरकी जोडीने इतिहास रचला आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोघांनीही आयसीसीच्या क्रमवारीत संयुक्तरित्या अव्वल स्थान काबिज केलं आहे. आयसीसी क्रमवारीत दोन्ही फिरकी गोलंदाजांनी सारखे गुण मिळवून अव्वल स्थान गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा दोघांनाही 892 रेटिंग मिळाले आहेत.  त्यांच्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा जॉश हेझलवूड (863) आणि त्यानंतर श्रीलंकेचा रंगना हेराथ  (827) आहे.  बंगळुरूमध्ये झालेल्या दुस-या कसोटीत अश्विनने 8 विकेट घेतल्या होत्या तर जडेजाने 7 विकेट घेतल्या होत्या.  
यापुर्वी एप्रिल 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आणि मुथय्या मुरलीधरन संयुक्तरित्या एक नंबरवर होते. पण दोन फिरकी गोलंदाजांनी संयुक्तरित्या अव्वल स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 
मात्र, फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीला कांगारूंविरूद्धच्या दोन सामन्यात लवकर बाद होण्याचा फटका बसला. दुस-या स्थावरून तिस-या स्थानावर त्याची घसरण झाली. ऑस्ट्रेलियाचा स्मिथ या क्रमवारीत अव्वल आहे तर त्याच्याखाली न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा नंबर आहे.   
दुसरीकडे, अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत आर.अश्विनची एका स्थानाने घसरण होऊन तो दुस-या क्रमांकावर आला आहे. बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने पहिलं स्थान मिळवलं असून त्याचे 441 रेटिंग आहेत.