बायकोच्या हट्टापायी विरुची सचिनच्या प्रीमिअरला दांडी

By Admin | Updated: May 26, 2017 10:59 IST2017-05-26T10:52:03+5:302017-05-26T10:59:28+5:30

चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला भारतीय क्रिकेट संघापासून ते बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते

Dandi of Sachin's Premiere | बायकोच्या हट्टापायी विरुची सचिनच्या प्रीमिअरला दांडी

बायकोच्या हट्टापायी विरुची सचिनच्या प्रीमिअरला दांडी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या आयुष्यावर आधारित "सचिन अ बिलियन ड्रीम्स" चित्रपटाचा ग्रॅण्ड प्रीमिअर सोहळा पार पडला. चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला भारतीय क्रिकेट संघापासून ते बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. मात्र या सोहळ्यात सचिनसोबत मैदानात ओपनिंग करणारा स्फोटक फलंदाज आणि खास मित्र सेहवाग न दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सेहवागसाठी सचिन म्हणजे देव असून आपल्या देवासाठी हा भक्त आला कसा नाही असा प्रश्न सगळे विचारु लागले. मात्र सेहवगाने ट्विटरवरुन आपल्या अनुपस्थितीचं कारण स्पष्ट केलं आहे.
 
("हिंद मेरे जिंद", सचिनचं आयुष्य उलगडणारं गाणं रिलीज)
 
विरेंद्र सेहवागने ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करत सचिन तेंडूलकरला चित्रपटासाठी शुभेच्छा देत खास संदेश दिला आहे. यासोबतच त्याने कॅप्शन दिली आहे की, "मला प्रीमिअरसाठी बोलावलं होतं, पण बायको सुट्ट्यांसाठी बाहेर घेऊन आली. देवाला मनवणं शक्य आहे, पण बायकोला कसं मनवायचं". बायकोसोबत सुट्ट्यांसाठी बाहेर असल्याने विरेंद्र सेहवाग प्रीमिअरला उपस्थित राहू शकला नाही.
 
सेहवागने व्हिडीओमध्ये सचिनसोबतच्या आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत. सचिनसोबत खेळत असल्या कारणाने विनातिकीट त्याची खेळी पाहायला मिळायची. मात्र यावेळी पैसे खर्च करुन तिकीट काढत त्याची खेळी पाहणार आहे. सेहवागने चाहत्यांनाही चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. तसंच हा चित्रपट लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी प्रेरणा देणारा असेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे. 
 
सचिन तेंडूलकरने आयोजित केलेल्या चित्रपटाच्या ग्रॅण्ड प्रीमिअरला संपुर्ण भारतीय क्रिकेट संघ उपस्थित होता. चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला. चित्रपट पाहिल्यानंतर विराट कोहली आणि धोनीने भरभरुन कौतुकही केलं. 
 

Web Title: Dandi of Sachin's Premiere