शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

१३व्या डावापर्यंत सामना बरोबरीत चालला होता, १४ व्या डावात चार तास, ५८ चाली... डी गुकेश जिंकला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 07:56 IST

१३व्या डावापर्यंत हा सामना बरोबरीत चालला होता. रोमहर्षक बनलेल्या १४व्या डावात गुकेशकडे लिरेनला पराभूत करून विश्वविजेता बनण्याची संधी होती.

सिंगापूर :  १८ वर्षांचा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने विश्व फिडे चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेत गुरुवारी चीनचा ३२ वर्षांचा विश्वविजेता डिंग लिरेन याला शेवटच्या डावात पराभूत केले आणि सर्वांत युवा विश्व चॅम्पियन बनण्याचा मान पटकावला. १८वा विश्वविजेता म्हणून गुकेशचे नाव बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. 

विजेतेपदाबद्दल गुकेशला २५ लाख डॉलर्सचा पुरस्कार मिळाला. १३व्या डावापर्यंत हा सामना बरोबरीत चालला होता. रोमहर्षक बनलेल्या १४व्या डावात गुकेशकडे लिरेनला पराभूत करून विश्वविजेता बनण्याची संधी होती. गुकेशने आव्हान स्वीकारले आणि चार तासांत ५८व्या चालींनंतर ७.५ वि. ६.५ अशा फरकाने सामना जिंकला. २०१८ साली सलग १०८ दिवस न हरता खेळण्याचा पराक्रम लिरेनने केला होता. अशा मातब्बर खेळाडूवर मात करत गुकेशने विश्वस्तरावर नवी ओळख निर्माण केली.

गुकेशसाठी स्वप्नवत वर्षगुकेशसाठी हे वर्ष स्वप्नवत ठरले. त्याने सप्टेंबर २०२४ मध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतासाठी पुरुष संघाचे सुवर्ण पदक जिंकले. याच स्पर्धेत नागपूरच्या दिव्या देशमुखचा समावेश असलेल्या भारताच्या महिला संघाने देखील सुवर्ण जिंकले होते. आता गुकेश वैयक्तिक विश्व विजेता बनला आहे.

वडीलांना जादू की झप्पी...गुकेश विश्वविजेता बनताच बाहेर वाट पाहत असलेल्या त्याच्या वडिलांनी पहिल्यांदा त्याला मिठी मारली, यावेळी गुकेश अत्यंत भावूक झाला होता. .गुकेशची आतमध्ये मॅच सुरु असताना त्याचे वडील बाहेर उभे होते. यावेळी मोबाईलवर ते खेळाचा स्कोअर पाहत होते, यानंतर आपला मुलगा जिंकल्याचे लक्षात येताच ते थेट गुकेशला भेटण्यासाठी निघाले. यावेळी या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये वाटेत त्यांना इतर लोक अभिनंदन करण्यासाठी हात पुढे करत होते. परंतू विश्वविजेता ठरलेल्या मुलाला भेटण्यासाठी ते आतूर झाले होते त्यामुळे ते घाईघाईत त्याला भेटण्यासाठी जातानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. गुकेश  बाहेर आला आणि   वडिलांना कडकडून मिठी मारली. हा बाप-लेकामधील अत्यंत भावूक क्षण  मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला. 

पहिली लढत    गुकेश पराभूत वि. लिरेन     ०-१दुसरी लढत    गुकेश बरोबरी वि. लिरेन     ०.५-१.५तिसरी लढत    गुकेश विजयी वि. लिरेन     १.५-१.५चौथी लढत    गुकेश बरोबरी वि. लिरेन     २-२पाचवी लढत    गुकेश बरोबरी वि. लिरेन     २.५-२.५सहावी लढत    गुकेश बरोबरी वि. लिरेन     ३-३सातवी लढत    गुकेश बरोबरी वि. लिरेन     ३.५-३.५आठवी लढत    गुकेश बरोबरी वि. लिरेन     ४-४नववी लढत    गुकेश बरोबरी वि. लिरेन    ४.५-४.५दहावी लढत    गुकेश बरोबरी वि. लिरेन     ५-५अकरावी लढत    गुकेश विजयी वि. लिरेन     ५.५-५बारावी लढत    गुकेश पराभूत वि. लिरेन     ५.५-५.५तेरावी लढत    गुकेश बरोबरी वि. लिरेन     ६.५-६.५चौदावी लढत    गुकेश विजयी वि. लिरेन     ७.५-६.५

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी केले अभिनंदन

नवी दिल्ली : सर्वांत युवा विश्व चॅम्पियन बनल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी. गुकेशच्या कामगिरीचे कौतुक करीत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. गुकेशच्या जेतेपदामुळे त्याचे नाव बुद्धिबळाच्या इतिहासात अजरामर झालेच, शिवाय लाखो युवा खेळाडूंना स्वप्न जोपासण्याची आणि उत्कृष्ट बनण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

विश्व बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वांत कमी वयाचा बुद्धिबळपटू गुकेशचे हार्दिक अभिनंदन! गुकेश तू भारताचा गौरव वाढवला आहेस. तुझ्या जेतेपदामुळे बुद्धिबळातील महाशक्ती म्हणून भारताची ताकद अधिक भक्कम बनली आहे. फारच सुंदर गुकेश! प्रत्येक भारतीयाकडून मी तुझ्या गौरवशाली भविष्याबद्दल कामना करीत आहे.- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

 ऐतिहासिक आणि अनुकरणीय! डी. गुकेशचे या उल्लेखनीय कामगिरीसाठी अभिनंदन! हे त्याच्यातील अद्वितीय प्रतिभा, कठोर मेहनत आणि दृढनिश्चयाचे फळ आहे. त्याने स्वत:च्या कामगिरीमुळे लाखो युवा खेळाडूंना प्रेरित केेले आहे. उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा! - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Chessबुद्धीबळ