शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

CWG 2022:राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना! सायकलस्वार ट्रॅकवरून घसरले, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 17:25 IST

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.

बर्गिंहॅम : इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022)चे आयोजन करण्यात आले आहे, जिथे जगभरातील ७२ देशातील थलीट सहभागी झाले आहेत. आपल्या देशातील खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक देशातील प्रेक्षकांची संख्या देखील विक्रमी आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना स्पर्धेला एका दुर्घटनेने गालबोट लावले आहे. कारण पुरुषांच्या १५ किमी स्क्रॅच सायकलिंग स्पर्धेदरम्यान एक अपघात झाला आहे. 

वॉल्स गंभीर जखमीइंग्लंडचा सायकलस्वार मॅट वॉल्स आणि कॅनाडाचा डेरेक जी या दोघांचा सायकलवरून अचानक तोल गेल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही सायकलचे ट्रॅक सोडून प्रेक्षकांमध्ये घुसले, ज्यामुळे मोठी दुर्घटना घडली. २४ वर्षीय वॉल्स गंभीर जखमी झाला आहे. तर आयल ऑफ मॅन सायकलपटू मॅथ्यू बोस्टॉकचा देखील या अपघातात समावेश होता. वॉल्स, डेरेक गी आणि बोस्टॉक या तिघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

स्पर्धेच्या एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, "सायकलस्वारांचे अचानक संतुलन गेल्याने ही दुर्घटना झाली. यामध्ये काही प्रेक्षकांना देखील दुखापत झाली आहे मात्र सुदैवाने त्यांना जास्त दुखापत झाली नाही. तीन सायकलस्वारांवर प्रथम तिथेच उपचार करण्यात आले मात्र नंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले. परंतु आता सर्व सायकलस्वारांची प्रकृती ठिक असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे."

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाCyclingसायकलिंगAccidentअपघातhospitalहॉस्पिटलEnglandइंग्लंड