व्हाईटवॉश देण्यास उत्सुक : हुसेन

By Admin | Updated: June 24, 2015 00:59 IST2015-06-24T00:59:37+5:302015-06-24T00:59:37+5:30

बुधवारच्या लढतीत विजय मिळवून मालिकेत भारताचा ३-० ने सफाया करण्यात यश मिळेल, असा विश्वास बांगलादेश संघाचा फलंदाज नासीर हुसेनने व्यक्त केला

Curious to give Whitewash: Hussein | व्हाईटवॉश देण्यास उत्सुक : हुसेन

व्हाईटवॉश देण्यास उत्सुक : हुसेन

मिरपूर : बुधवारच्या लढतीत विजय मिळवून मालिकेत भारताचा ३-० ने सफाया करण्यात यश मिळेल, असा विश्वास बांगलादेश संघाचा फलंदाज नासीर हुसेनने व्यक्त केला. मात्र, त्याने स्थानिक चाहत्यांतर्फे वापरल्या जाणाऱ्या ‘बांगलावॉश’ शब्दाला विशेष महत्त्व दिले नाही.
तिसऱ्या वन-डे सामन्यांच्या पूर्वसंध्येला बोलताना हुसेन म्हणाला, ‘‘बांगलावॉश’सारखी कुठली बाब नाही. आम्ही सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहोत. काही वेळापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये चर्चा झाली असून, पहिल्या दोन लढतींची रणनीती कायम ठेवण्यावर भर देण्यात आला.’’ भारताविरुद्धच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतल्यानंतर बांगलादेश संघ मायदेशात सलग ११वा विजय नोंदवण्यास उत्सुक आहे.

Web Title: Curious to give Whitewash: Hussein