‘ती’ छायाचित्रे प्रसिद्ध होताच क्रोएशिया फुटबॉलपटू ‘अंडरग्राऊंड’

By Admin | Updated: June 17, 2014 04:06 IST2014-06-17T04:06:41+5:302014-06-17T04:06:41+5:30

निर्वस्त्र आॅनलाईन छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यामुळे क्रोएशियाच्या फुटबॉलपटूंनी लाजेखातर मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मीडियापुढे येण्यास सर्वांनी चक्क नकार दिला

Croatian film 'Underground' | ‘ती’ छायाचित्रे प्रसिद्ध होताच क्रोएशिया फुटबॉलपटू ‘अंडरग्राऊंड’

‘ती’ छायाचित्रे प्रसिद्ध होताच क्रोएशिया फुटबॉलपटू ‘अंडरग्राऊंड’

साल्वाडोर: निर्वस्त्र आॅनलाईन छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यामुळे क्रोएशियाच्या फुटबॉलपटूंनी लाजेखातर मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मीडियापुढे येण्यास सर्वांनी चक्क नकार दिला.
दोन छायाचित्रकारांनाी स्घाचे वास्तव्य असलेलय हॉटेलजवळच्या झाडामागे लपून खेळाडूंची आंघोळ करताना छायाचित्र टिपली होती. ही सर्वच छायाचित्रे नंतर आॅनलाईन लीक रण्यात आली. क्रोएशियाचे कोच निको कोवाक यांनी यावर तीव्र नापसंती दर्शविली. ते म्हणाले,‘ कुणी विवस्त्र छायाचित्रे घेतली तर तुम्हाला कसे वाटेल? आता मीडियाशी माझे खेळाडू बोलनार नाहीत. हा अबोला कधी संपेल हे सांगता येणार नाही. कदाचित आमचे विश्वचषकातील आव्हान संपेपर्यंत तरी असेच सुरू राहणार!’ क्रोएशियाचे खेळाडू डेजान लोवरेन व व्हेडरॉन कोरलुका हे छायाचित्रात स्पष्टपणे दिसत आहेत. कोवाक पुढे म्हणाले,‘ मी खेळाडूंच्या निर्णयाचा आदर करतो. मीडियाने आतापर्यंतचे काम व्यावसायिकपणे केले पण या कृत्यामुळे तुमच्यावर डाग लागला. संपूर्ण जग ही छायाचित्रे पाहात आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Croatian film 'Underground'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.