हॅडिनला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर टीका
By Admin | Updated: July 30, 2015 01:04 IST2015-07-30T01:04:43+5:302015-07-30T01:04:43+5:30
आॅस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिंग आणि इयान हिली यांनी इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत ब्रॅड हॅडिनला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.

हॅडिनला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर टीका
सिडनी : आॅस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिंग आणि इयान हिली यांनी इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत ब्रॅड हॅडिनला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. ही मोठी चूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे, तर मॅथ्यू हेडनने ही अवमानजनक बाब असल्याचे सांगितले.
उपकर्णधार हॅडिनच्या स्थानी या सामन्यात युवा पीटर नेविलचा समावेश करण्यात आला आहे. त्याने दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी केली होती. २७ वर्षीय हॅडिन त्याच्या मुलींची तब्येत बरोबर नसल्याने दुसरी कसोटी खेळला नव्हता.
माजी कर्णधार हेडन म्हणाला, ‘‘त्याच्यासोबत जे काही झाले किंवा अशा प्रकारे त्याला कसोटी संघाबाहेर केले जाणे हे अवमानजनक आहे.’’ ब्रॅड हॅडिनसोबत हा कठोर निर्णय आहे.
मी ब्रॅड हॅडिनला कसोटी संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाने निराश आहे. तो लॉडर््सवर खेळू शकला असता; परंतु आजारी मुलीबरोबर राहण्याचा त्याचा निर्णय योग्य होता. हा त्याच्यासाठी कठोर निर्णय आहे.
- रिकी पाँटिंग