शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अब तक १,०००,०००,०००! एवढे 'फॉलोअर्स' कमावणारा रोनाल्डो जगातील पहिला अन् एकमेव माणूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 14:01 IST

फिटनेसच्या जोरावर फुटबॉलच्या मैदानातील दमदार कामगिरीनं 'एक से बढकर एक' विक्रम नोंदवणाऱ्या या पठ्यानं आता  चाहत्यांच्या जोरावर अशक्यप्राय 'गोल'चा टप्पा साध्य केला आहे. 

जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या  स्टार फुटबॉलर ख्रिस्टियानो रोनाल्डो यानं नव्या महा विक्रमाला गवसणी घातली आहे. कमालीच्या फिटनेसच्या जोरावर फुटबॉलच्या मैदानातील दमदार कामगिरीनं 'एक से बढकर एक' विक्रम नोंदवणाऱ्या या पठ्यानं आता  चाहत्यांच्या जोरावर अशक्यप्राय 'गोल'चा टप्पा साध्य केला आहे. 

अब्जाधीश फॉलोअर्स असणारा पहिला खेळाडू ठरला रोनाल्डो

सोशल मीडियावर त्याने एक बिलियन म्हणजेच एक अब्ज फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. रोनाल्डो हा एक अब्ज फॉलोअर्स असणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.  याआधी अल नासर क्लबच्या स्ट्रायकरनं काही दिवसांपूर्वीच आपल्या कारकिर्दीतील ९०० गोलचा टप्पा गाठला होता. या ऐतिहासिक कामगिरीनंतर नेहमी पाठीशी असणाऱ्या चाहत्यांचे रोनाल्डोनं आभारही मानलल्याचे पाहायला मिळाले होते. हेच कारण आहे ज्यामुळे दिवसागणिक त्याच्या चाहत्यांचा आकडा अगदी वेगाने वाढतानाचे चित्र पाहायला मिळते. 

याआधी कुणालाच मिळालेली नाही एवढी लोकप्रियता

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोनाल्डोच्या फॉलोअर्सचा आकडा हा एक अब्जहून अधिक झाला आहे. जगभरातून  इतक्या मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग कमावणारा तो फक्त पहिला खेळाडूच नाही तर जगातील तो पहिला व्यक्ती आहे ज्याने सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग कमावला आहे. 

रोनाल्डोनं खास शब्दांत व्यक्त केल्या मनातील भावना

रोनाल्डोनं एक्स (पूर्वीचे ट्विटर) च्या माध्यमातून १ बिलियन फॉलोअर्सचा आकडा पार केल्याची माहिती शेअर केली आहे. १ बिलियन फॉलोअर्ससह आपण इतिहास रचला आहे. हा फक्त एक आकडा नाही तर खेळाप्रतीची प्रेरणा आणि प्रेम याचा हा पुरावा आहे. मदीराच्या गल्लीपासून ते जगातील सर्वात मोठ्या व्यासपीठापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. माझ्या आयुष्याचा हिस्सा झालेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे, अशा शब्दांत रोनाल्डोनं चढ उताराच्या काळात नेहमी सोबत असणाऱ्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉल