शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

आरारारा... खत्तरनाक! एका दिवसात १,००,००,००० सबस्क्राईबर्स; रोनाल्डोचा YouTube वर झंझावाती 'गोल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 09:42 IST

रोनाल्डोनं मैदानाबाहेर केलेल्या रेकॉर्डची चर्चा; पोर्तुगालच्या स्टार फुटबॉलपटून युट्यूब चॅनेलवर अगदी दाबात मारलीये एन्ट्री

फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो मैदानात उतरला की, त्याच्या रेकॉर्डवर नजरा असतात. एवढेच नाही तर त्याला संघात घेण्यासाठी अमाप पैसा खर्च करणारे फुटबॉल क्लबची कमी नाही. कारण हा खेळाडू लोकप्रियतेची हमी आहे. आता रोनाल्डोनं मैदानाबाहेर केलेल्या रेकॉर्डची चर्चा आहे. पोर्तुगालच्या ३९ वर्षीय रोनाल्डोनं युट्यूब चॅनेलवर अगदी दाबात एन्ट्री मारलीये. 

रोनाल्डोनं मैदानाबाहेर सेट केला खास विक्रम

रोनाल्डोनं UR Cristiano या नावाने आपलं  YouTube चॅनेल लॉन्च केले आहे.  तो युट्यूब चॅनेलवर येताच एक नवा विक्रम त्याच्या नावे झाला आहे. काही तासांतच त्याने १० मिलियनचा आकडा गाठला. हा एक रेकॉर्डच आहे. युट्युबवर चॅनेल काढल्यावर सबस्क्राईबर  मिळवण्यासाठी अनेकजणांना मोठी कसरत करावी लागते.  पण रोनाल्डोची लोकप्रियताच इतकी तुफान आहे की, ज्यासाठी लोक आयुष्यभर झटतात ते त्याने काही क्षणात करून दाखवलं आहे. 

सात दिवसांत सेट झालेला वर्ल्ड रेकॉर्ड फक्त एका दिवसांत मोडला  

रोनाल्डोनं युट्युब चॅनेल लॉन्च केल्यानंतर पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्जसह मजेदार क्विझ गेमसह अन्य काही खास व्हिडिओ क्लिप शेअर केल्या आहेत.  रोनाल्डोच्या या नव्या चॅनेलने ९० मिनिटांपेक्षा कमी काळात एक मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स  कमावले. त्यामुळे त्याला युट्युबवर सर्वात वेगाने १० मिलियनचा टप्पा अगदी २४ तासांत गाठणं सहज शक्य झाले. यासह रोनाल्डोच्या चॅनेलनं लोकप्रिय ठरलेल्या   हॅमस्टर कॉम्बॅट व्हायरल टॅप-टू-अर्न गेम चॅनेलचा विक्रम मोडीत काढला.  हॅम्स्टर कोम्बॅटनं ७ दिवसांत हा टप्पा गाठला होता. हा विक्रम रोनाल्डोनं अवघ्या एका दिवसांत मागे टाकला.

सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दिसते त्याचीच हवा!

सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अधिराज्य गाजवणाऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डो आघाडीवर असल्याचे दिसून येते.  X वर त्याच्या फॉलोअर्सचा आकडा हा ११२.५ मिलियन इतका आहे. फेसबुकवर त्याला १७० मिलयन चाहते फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर त्याने ६३६ मिलियन  फॉलोअर्स कमावले आहेत. आता त्यात युट्युब चॅनेलची भर पडलीये. इथंही तो सर्वांत आघाडीवर पोहचला आहे. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोYouTubeयु ट्यूबFootballफुटबॉल