फुटबॉल जगतातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. पोर्तुगालच्या स्टार खेळाडूनं सौदी सुपर कपच्या फायनलमध्ये अल नासरच्या संघाकडून १०० वा गोल डागला. या कामगिरीसह वेगवेगळ्या ४ संघाकडून १०० पेक्षा अधिक गोल करण्याचा महा रेकॉर्ड आता रोनाल्डोच्या नावे झाला आहे. फुटबॉलच्या आतापर्यंतच्या इतिहासात अन्य कोणत्याही खेळाडूनं अशी कामगिरी केलेली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोनाल्डोनं मोठा डाव साधला, पण त्याचा संघ हरला
सौदी सुपर लीगच्या फायनलमध्ये अल नासर विरुद्ध अल अहली यांच्यात सामना रंगला होता. जेतेपदाच्या लढतीत रोनाल्डोनं या क्लबकडून १०० गोल करण्याचा डाव साधला. पण या सामन्यात रोनाल्डोच्या संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत राहिला. पेनल्टी शूटआउटमध्ये अल अहली क्लबां रोनाल्डोच्या अल नासर संघाचा ५-३ अशी मात दिली.
कोणत्या क्लबकडून खेळताना किती गोल डागले?
अल नासर क्लबकडून १०० गोल नोंदवण्या आधी रोनाल्डोनं अल माद्रिदकडून खेळताना ४५० गोल केल्याचा रेकॉर्ड आहे. एका क्लबकडून रोनाल्डोची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय मँचेस्टर युनायटेडकडून त्याने १४५ तर युव्हेंटस क्लबकडून खेळताना १०१ गोल डागले आहेत. पोर्तुगालकडून खेळतानाही त्याच्या खात्यात १३८ गोलची नोंद आहे. हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोलचा विक्रम आहे.