मुंबई : पश्चिम बंगालच्या क्रिश कपूरने अव्वल मानांकित हर्षित मुछल याचा धक्कादायक पराभव करून माटुंगा जिमखाना अखिल भारतीय ज्युनिअर खुल्या स्क्वॉश स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या फायनलमध्ये धडक मारली. क्रिशने उपांत्य फेरीत मुछलचा ११-९, ११-६, ११-७ असा सहज पराभव केला. जेतेपदासाठी त्याला महाराष्ट्राच्या हर्षवर्धन वाधवा याच्याशी भिडावे लागेल. हर्षवर्धन याने उपांत्य फेरीत आरन थवानी याला ११-३, ११-३, ११-९ असे पराभूत केले.तामिळनाडूच्या श्रीमन राघवन यानेही १३ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या तनय पंजाबीचा ११-६, ६-११, ११-९, १२-१० असा पराभव करून जेतेपदासाठी अव्वल मानांकित नवनीत प्रभूसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. जाएंट किलर तुषार शहानी याने १७ वर्षांखालील गटात दुसऱ्या मानांकित आर्यमान आदिकला पराभूत केले, तर १३ वर्षांखालील मुलींच्या गटात ऐश्वर्या खुबचंदानी हिने अव्वल मानांकित अवनी नागरचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. १५ वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या दिया जौकानीने पाच गेम चाललेल्या अटीतटीच्या लढतीत अनन्या दाबकेवर निसटता विजय मिळवून अंतिम फेरी गाठली.उपांत्य फेरीचे निकालमुले - ११ वर्षांखालील गट : जयवीर सिंग ढिल्लोन (दिल्ली) वि. वि. शरन पंजाबी १४-१२, ११-८, ११-१; पार्थिव योगेश वि. वि. युवराज वाधवानी १३-११, ११-२, ११-५. १३ वर्षांखालील गट - नवनीत प्रभू वि. वि. कन्हाव नानावटी ११-६, ११-४, ११-८; श्रीमान राघवन वि. वि. तनय पंजाबी ११-६, ६-११, ११-९, १२-१०. १५ वर्षांखालील गट - वीर चोत्रानी वि. वि. अद्वैत आदिक ११-८, ११-५, ११-५; आर्यन पारेख वि. वि. राहुल बैथा ११-९, ११-७, ५-११, ११-६. १७ वर्षांखालील गट - अभय सिंग वि. वि. संदीप पासवान ११-८, ९-११, ११-५, ११-५; तुषार शहानी वि. वि. आर्यमान आदिक १२-१०, ६-११, ११-४, ११-५. (क्रीडा प्रतिनिधी)दियाची फायनलमध्ये झेपमुलींचया १५ वर्षांखालील गटात दिया जौकानी हिने फायनलमध्ये प्रवेश केला. तिने ०-१ अशा पिछाडीवरून अनन्या दाबकेचा ८-११, १२-१०, ११-२, ७-११, ११-९ असा पराभव केला. जेतेपदासाठी तिला आकांक्षा राव हिच्याशी झुंज करावी लागेल. आकांक्षाने कृतिका जेएसचा ११-६, ११-९, ११-१ असा पराभव केला. १७ वर्षांखालील गटात जुई कलगुटकर आणि सुनन्या कुरविल्ला यांच्यात जेतेपदाची लढत रंगेल.