क्रिकेटपटूच्या पत्नीला अटक
By Admin | Updated: October 4, 2015 23:44 IST2015-10-04T23:44:41+5:302015-10-04T23:44:41+5:30
बांगलादेश क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज शहादत हुसेनच्या पत्नीला ११ वर्षांच्या मोलकरणीला मारहाण केल्याबद्दल पोलिसांनी अटक केली आहे.

क्रिकेटपटूच्या पत्नीला अटक
मोलकरणीला मारहाण प्रकरण
ढाका : बांगलादेश क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज शहादत हुसेनच्या पत्नीला ११ वर्षांच्या मोलकरणीला मारहाण केल्याबद्दल पोलिसांनी अटक केली आहे.
शहादत आणि त्याची पत्नी रित्तो शहादत यांनी मोलकरणीला मारहाण केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यांतून झाला होता. पोलिसांनी गेल्या महिन्यातील २९ तारखेला त्यांच्या घरावर छापा टाकला होता. या दोघांवर अटकेची तलवार लटकत असल्याने त्याला संघातूनही वगळले होते. हे दोघेही भूमिगत झाले होते. परंतु पोलिसांनी रविवारी रित्तोला तिच्या एका नातेवाईकाच्या घरातून अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की, हुसेन दाम्पत्यांने या बालिकेला मारहाण करून घरातून हाकलून दिले होते. (वृत्तसंस्था)