करोडपती मेस्सी म्हणतो, ब्राझीलमध्ये भाड्याचे घर महागडे
By Admin | Updated: June 13, 2014 04:35 IST2014-06-13T04:35:53+5:302014-06-13T04:35:53+5:30
भाड्याने घर घेणे मोठ्या प्रमाणावर महागात पडत असल्याचे अर्जेंटिनाचा प्रसिद्ध आणि सर्वांत श्रीमंत फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने म्हटले आहे

करोडपती मेस्सी म्हणतो, ब्राझीलमध्ये भाड्याचे घर महागडे
ब्राझील : भाड्याने घर घेणे मोठ्या प्रमाणावर महागात पडत असल्याचे अर्जेंटिनाचा प्रसिद्ध आणि सर्वांत श्रीमंत फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने म्हटले आहे.साओ पावलो येथील एका स्थानिक आॅनलाइन वृत्तपत्राने छापलेल्या माहितीनुसार, मेस्सी याने बेलो होरीजोंटे शहरालगत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त परिवाराला वास्तव्य करता यावे यासाठी घर भाड्याने घेण्याचे ठरवले होते. त्या घराचे भाडे ६७ हजार ६०० डॉलर दरमहिन्याला आहे.
मात्र त्यासाठी लागणारा खर्च पाहता त्याने या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. सध्या त्याचा ज्या बार्सिलोना क्लबसोबत करार आहे त्यापोटी त्याला वार्षिक २.७ करोड डॉलर्सची कमाई होत आहे. मात्र सध्या ब्राझील शहरातील जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याचेही वास्तव आहे. त्या घरामध्ये ७ आलिशान खोल्या, १३ विश्रांती गृहे आणि ८६ हजार स्क्वेअरफूट मोकळी जागा तलावाच्या भोवती. या स्पर्धेसाठी अर्जेंटीनाचा संघ बेलो हॉरिझॉँटे या तिसऱ्या क्रमांच्या ब्राझीलच्या मोठ्या शहरात वास्तव्यास आहे. (वृत्तसंस्था)