छातीत बॉल लागून क्रिकेटपटूचा मृत्यू
By Admin | Updated: January 27, 2015 13:26 IST2015-01-27T13:25:50+5:302015-01-27T13:26:40+5:30
पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळत असताना चेंडू छातीत लागल्यावर एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

छातीत बॉल लागून क्रिकेटपटूचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. २७ - पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळत असताना चेंडू छातीत लागल्यावर एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक स्पर्धेत ही घटना घडली असून झिशान मोहम्मद असे या क्रिकेटपटूचे नाव आहे.
रविवारी कराचीतील ओरंगी टाऊन या भागात क्रिकेट स्पर्धा सुरु होती. झीशान मोहम्मद हा फलंदाजी करत असताना वेगात आलेला चेंडू त्याच्या छातीवर लागला. यानंतर झीशान मैदानातच कोसळला. यानंतर त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत झीशानचा मृत्यू झाला. झीशानचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती डॉक्टरांनी स्थानिक वृत्तपत्रांना दिली.
गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्यूजेसचा डोक्यावर चेंडू लागल्याने मृत्यू झाला होता. तर इस्त्रायलमध्येही क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने अंपायरचा मृत्यू झाला होता.