पणजी क्लबतर्फे क्रिकेट स्पर्धा
By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:39+5:302015-06-02T00:03:39+5:30
पणजी : पणजी स्पोर्ट्स ॲण्ड कल्चरल क्लबतर्फे पहिली अखिल गोवा टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा येत्या ६ व ७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा कांपाल येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर होईल. स्पर्धेतील विजेत्या संघास ७१ हजार व चषक, उपविजेत्या संघास ४१ हजार व चषक तर उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. याशिवाय वैयक्तिक बक्षिसेही असतील. इच्छुकांनी आपला प्रवेश ४ जूनपर्यंत निश्चित करावा. अधिक माहितीसाठी शेख अदाम यांच्याशी संपर्क साधावा.

पणजी क्लबतर्फे क्रिकेट स्पर्धा
प जी : पणजी स्पोर्ट्स ॲण्ड कल्चरल क्लबतर्फे पहिली अखिल गोवा टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा येत्या ६ व ७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा कांपाल येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर होईल. स्पर्धेतील विजेत्या संघास ७१ हजार व चषक, उपविजेत्या संघास ४१ हजार व चषक तर उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. याशिवाय वैयक्तिक बक्षिसेही असतील. इच्छुकांनी आपला प्रवेश ४ जूनपर्यंत निश्चित करावा. अधिक माहितीसाठी शेख अदाम यांच्याशी संपर्क साधावा.