यशाचे श्रेय अक्रमला : युसूफ

By Admin | Updated: May 27, 2014 06:18 IST2014-05-27T06:18:25+5:302014-05-27T06:18:25+5:30

कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक फलंदाज युसूफ पठाण याने आपल्या यशाचे श्रेय गोलंदाजी प्रशिक्षक वसीम अक्रम यांना दिले आहे़ अक्रम यांच्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांची मानसिकता समजून घेण्यास मदत झाली

Credit worth success: Yusuf | यशाचे श्रेय अक्रमला : युसूफ

यशाचे श्रेय अक्रमला : युसूफ

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक फलंदाज युसूफ पठाण याने आपल्या यशाचे श्रेय गोलंदाजी प्रशिक्षक वसीम अक्रम यांना दिले आहे़ अक्रम यांच्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांची मानसिकता समजून घेण्यास मदत झाली आहे, असेही पठाण याने म्हटले आहे़ तो पुढे म्हणाला, की संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक अक्र म यांच्यामुळे मानसिकरीत्या सक्षम होण्यास मदत मिळाली आहे़ त्यांनी फलंदाजी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल विशेष मार्गदर्शन केले़ याच बळावर मला यश मिळाले आहे़ यापुढे कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न राहील़ सनरायजर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या लढतीत पठाण याने २२ चेंडूंत ७२ धावांची खेळी केली होती़ (वृत्तसंस्था)

Web Title: Credit worth success: Yusuf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.