शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

'कोर्ट'चा वाद, सायनाची राष्ट्रीय स्पर्धेतून माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 21:22 IST

... त्यामुळे सायना या स्पर्धेत खेळायला तयार नसल्याचे म्हटले जात आहे.

नवी दिल्ली : भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त नुकतेच आले आहे. 'कोर्ट'चा वाद असल्यामुळे सायना या स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला आसाम येथे आजपासून सुरुवात झाली. सायना दुखापतीनंतर या स्पर्धेमध्ये उतरणार होती. सायना या स्पर्धेच्या कोर्टवर उतरली आणि तिला ते योग्य असल्याचे वाटले नाही. बॅडमिंटनचे कोर्ट योग्य नसल्याचे सांगत सायनाने या स्पर्धेत खेळायला नकार दिला.

सायनाने नकार दिल्यावर भारतीय बॅडमिंटन महासंघाचे पदाधिकारी तिला भेटले. याबाबत अधिकाऱ्यांनी सायनाशी चर्चा केली. सायना या स्पर्धेत खेळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्यावर्षी सायनाच्य पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर सायना भारतामध्ये या स्पर्धेत उतरणार होती. पण बॅडमिंटन कोर्टचा दर्जाचा चांगला नसल्यामुळे सायनाने राष्ट्रीय स्पर्धेत खेळायला नकार दिला. आता यापुढे ऑल इंग्लंड बॅडमिंटन ही मानाची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत खेळता यावे, यासाठी सायनाला जोखीम उचलायची नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे सायना या स्पर्धेत खेळायला तयार नसल्याचे म्हटले जात आहे.

वर्षाअखेर पीबीएल खेळल्याने शरीरावर विपरीत परिणाम - सायना‘वर्षभर विविध स्पर्धांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर वर्षाअखेर प्रीमियर बॅडमिंटन लीग खेळल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,’ असे स्पष्ट मत स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले.सायना म्हणाली,‘प्रत्येक खेळाडू शंभर टक्के योगदान देऊन जिंकू इच्छितो. मात्र, पीबीएलचे आयोजन वर्षाअखेर होत असल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही सर्वांत कठीण स्पर्धांपैकी एक असल्याने कुठल्याही खेळाडूंसाठी या स्पर्धेत खेळणे सोपी गोष्ट नाही. पण त्याचवेळी, प्रत्येकजण या स्पर्धेत स्वत: सर्वोत्कृष्ट कामगिरी करू इच्छितो.’नऊ संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये सायना नॉर्थ इस्ट वॉरियर्सचे नेतृत्व करणार आहे. सुपर सिरीजसारखीच कामगिरी करण्यास खेळाडू पीबीएलमध्ये इच्छुक असतात का, असा प्रश्न सायनाला विचारण्यात आला होता. यावर सायना म्हणाली,‘पीबीएल अन्य स्पर्धेसारखी नसून सांघिक स्पर्धा आहे. यात खेळणे आनंददायी असते. आमच्यासाठी हा उत्सव आहे. या स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना लाभ होतो शिवाय खेळाचा प्रचारदेखील होतो.’

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton