देशी व विदेशी शेरास सव्वा शेर

By Admin | Updated: April 29, 2015 01:36 IST2015-04-29T01:36:29+5:302015-04-29T01:36:29+5:30

सर्वाधिक धावा फटकावण्यासह सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये भारतीय व विदेशी खेळाडूंमध्ये बरोबरीची लढत असल्याचे चित्र आहे.

Country and Foreign Sheras Savva Sher | देशी व विदेशी शेरास सव्वा शेर

देशी व विदेशी शेरास सव्वा शेर

नवी दिल्ली : आयपीएलच्या आठव्या पर्वातील जवळजवळ अर्धा टप्पा आटोपला असून, सर्वाधिक धावा फटकावण्यासह सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये भारतीय व विदेशी खेळाडूंमध्ये बरोबरीची लढत असल्याचे चित्र आहे.
राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने सात सामन्यांत ३२३ धावा फटकावित आॅरेंज कॅप मिळवली आहे; तर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहिरने सात सामन्यांत १३ बळी घेत पर्पल कॅपचा मान मिळवला आहे.
चेन्नईचा कॅरेबियन खेळाडू ड्वेन स्मिथ (२२८) पाचव्या, दिल्ली डेअरडेव्हिल्सचा श्रेयस अय्यर (२२७) सहाव्या, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विराट कोहली (२२०) सातव्या, दिल्ली डेअरडेव्हिल्सचा जेपी ड्युमिनी (२२०) आठव्या, बेंगळुरूचा ख्रिस गेल (२०९) नवव्या तर मुंबई इंडियन्सचा किरोन पोलार्ड (२०२) दहाव्या स्थानी आहे.
स्पर्धेत आतापर्यंत १३ बळी घेणाऱ्या इम्रान ताहिरला चेन्नईच्या आशिष नेहराचे (१२ बळी) आव्हान आहे. बेंगळुरूचा युजवेंद्र चहल, मुंबईचा लसित मलिंगा व पंजाबचा अनुरित सिंग यांच्या नावावर प्रत्येकी १० बळींची नोंद आहे. कोलकाताचा मोर्न मोर्कल, पंजाबचा संदीप शर्मा, हैदराबादचा भुवनेश्वर कुमार व पंजाबचा अक्षर पटेल यांच्या खात्यावर प्रत्येकी ९ बळींची नोंद आहे.
आयपीएलच्या आठव्या पर्वात २७ सामने खेळले गेले असून, केवळ एका शतकाची नोंद झाली आहे. शतकी
खेळी चेन्नई संघाच्या मॅक्युलमच्या नावावर आहे. मॅक्युलमने ११ एप्रिल
रोजी चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत हैदराबादविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली होती. मुंबईचा रोहित शर्मा (नाबाद ९८), बेंगळुरूचा ख्रिस गेल (९६) व हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर (९१) यांना शतकी खेळी साकारण्याची संधी होती.
एका सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीची चर्चा करताना नेहरा, ड्युमिनी, मलिंगा, संदीप शर्मा, ताहिर व डेव्हिड वीसे यांनी प्रत्येकी चार बळी घेतले आहेत. नेहराने १० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले असून, सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीमध्ये तो आघाडीवर आहे.
स्पर्धेत अद्याप एकाही गोलंदाजाला एका सामन्यात पाच बळी घेण्याची कामगिरी करता आलेली नाही. चौकार-षटकारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये मॅक्युलम व श्रेयस अय्यर यांनी यंदाच्या पर्वात प्रत्येकी १४ षटकार ठोकले आहेत. गेल, पोलार्ड व वॉर्नर
यांनी प्रत्येकी १३ तर स्मिथ व रोहित यांनी प्रत्येकी १२ षटकार फटकावले
आहेत. (वृत्तसंस्था)

सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार आॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर रहाणेला टक्कर देऊन दुसऱ्या स्थानी आहे. वॉर्नरने ४५.२८च्या सरासरीने ३१७ धावा फटकावल्या आहेत.

आठव्या पर्वात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या खेळाडूंमध्ये रहाणे ५३.८३च्या सरासरीने ३२३
धावा फटकावित सर्वांत आघाडीवर आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (२४४) तिसऱ्या तर चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू ब्रेंडन मॅक्युलम (२३२) चौथ्या स्थानी आहे.

Web Title: Country and Foreign Sheras Savva Sher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.