...तर आणखी जेतेपद मिळविले असते : सायना
By Admin | Updated: December 14, 2014 23:58 IST2014-12-14T23:58:33+5:302014-12-14T23:58:33+5:30
या वर्षांत झालेल्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे; मात्र काही संधी गमावल्या नसत्या तर यापेक्षाही अधिक अजिंक्यपद मिळविण्यात यश आले असते,

...तर आणखी जेतेपद मिळविले असते : सायना
नवी दिल्ली : या वर्षांत झालेल्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे; मात्र काही संधी गमावल्या नसत्या तर यापेक्षाही अधिक अजिंक्यपद मिळविण्यात यश आले असते, असे मत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने म्हटले आहे़
विशेष म्हणजे २०१३ मध्ये सायनाला एकाही प्रतिष्ठित स्पर्धेचे अजिंक्यपद आपल्या नावे करता आले नव्हते; मात्र २०१४ मध्ये तिने जोरदार कमबॅक करताना इंडिया, ओपन ग्रां़ प्री, आॅस्ट्रेलिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद मिळविले होते़ उबेर चषक आणि आशियाई खेळात महिला संघाला कांस्यपदक मिळवून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका निभावली होती़ गत महिन्यात तिने चायना ओपन सुपर सीरिजचा किताब आपल्या नावे केला होता़ हा किबात जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली होती़
सायना पुढे म्हणाली, एक खेळाडू म्हणून सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उंचावण्यासाठी खेळ करते़ यावर्षी मी अनेक स्पर्धांचा किताब आपल्या नावे करण्यात यश मिळविले; मात्र मी यापेक्षाही सरस कामगिरी करू शकले, असेही सायनाने सांगितले़
आशियाई स्पर्धेपूर्वी सायनाने बंगलोर येथे माजी प्रशिक्षक विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणे सायनासाठी जमेची बाजू ठरली़ (वृत्तसंस्था)