‘आणखी कामगिरी उंचावू शकलो असतो’
By Admin | Updated: April 24, 2015 09:29 IST2015-04-24T00:36:02+5:302015-04-24T09:29:55+5:30
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने इंडियन प्रिमीअर लीगमध्ये गुरुवारी रात्री येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २७ धावांनी विजय मिळविल्यानंतर त्यांचा संघ त्यापेक्षा

‘आणखी कामगिरी उंचावू शकलो असतो’
बंगळुरू : चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने इंडियन प्रिमीअर लीगमध्ये गुरुवारी रात्री येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २७ धावांनी विजय मिळविल्यानंतर त्यांचा संघ त्यापेक्षा आणखी कामगिरी उंचावू शकला असता, असे म्हटले आहे.
धोनी म्हणाला, ‘‘विजय समाधानकारक आहे; परंतु आम्ही यापेक्षा जास्त चांगली कामगिरी करू शकलो असतो. आम्ही काही भागात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी आणखी चांगली करू शकलो असतो. आम्हाला दबाव ठेवायचा असेल, तर असे करावेच लागेल.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘आमचे फिरकी गोलंदाज या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तशी विकेट संथ होतील आणि अशा परिस्थितीत त्यांची भूमिका महत्त्वाची असू शकते.’’ दुसरीकडे, आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सांघिक कामगिरी करण्यात संघ अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.
कोहली म्हणाला, ‘‘सध्या मी काही जास्त सांगू शकत नाही. आम्ही स्वत:ला निराश केले आणि एक संघ म्हणून सांघिक कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. आम्हाला संघासोबत याविषयी चर्चा करावी लागेल.’’