शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संचालनालयातील भ्रष्ट साखळीचा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 22:19 IST

लाच प्रकरणी क्रीडा संचालनालयाच्या विभागीय उपसंचालकाला अटक

पुणे : राज्यस्तरीय हॅन्डबॉल खेळामध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी क्रीडा संचालनालयात सुरु असलेल्या लाचेची साखळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने समोर आणली असून याप्रकरणी विभागीय उपसंचालकाला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. अनिल मारुतराव चोरमल (वय ५४) असे या उपसंचालकाचे नाव आहे. विविध शासकीय नोकरी, पोलीस भरती तसेच उच्च शिक्षणासाठी खेळाडुंना काही जागा राखीव असतात. अशा जागांवर आपली वर्णी लागावी, यासाठी क्रीडा संचालनालयात प्रमाणपत्र मिळवून देणारी साखळी आहे. विविध संघटनांचे पदाधिकारी क्रीडा संचालनालयातील अधिकाºयांना हाताशी धरुन अशी प्रमाणपत्रे दिली जातात. याप्रकरणी एका खेळाडुकडे महाराष्ट्र हँडबॉल संघटना व पुणे जिल्हा हँडबॉल संघटनेचे पदाधिकारी रुपेश उत्तम मोरे व राजेश विठ्ठल गारडे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. लाचेच्या मागणीबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली होती. त्याच्या पडताळणीत या दोघांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत विभागीय उपसंचालकाचा लाच मागणीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अनिल मारुतराव चोरमल यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मागितलेले पैसे हे उपसंचालकांसाठीच मागितले असल्याचे पुरावे चौकशीत पुढे आल्याने ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक सीमा मेंहदळे  करीत आहेत. तक्रारदार यांनी २०१७ मध्ये राज्यस्तरीय हँडबॉल खेळामध्ये सहभाग घेतला होता. त्यांना पोलीस दलात भरती होण्यासाठी त्यांनी खेळाडू प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यासाठी त्यांच्याकडे असलेले राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र क्रीडा व युवा सेवा संचालनालय येथील उपसंचालकांकडून पडताळणी करुन हवे होते़ त्यासाठी राजेश गारडे व रुपेश मोरे यांनी तक्रारदाराला ३५ ते ४० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करत असताना २१ सप्टेंबर रोजी तडजोडीमध्ये २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, प्रत्यक्ष लाच स्वीकारली गेली नव्हती. असे असले तरी लाचेची मागणी केली होती. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हडपसर येथे लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली होती़.

टॅग्स :PuneपुणेBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी