फुटबॉलसाठी योगदान द्यायचे आहे - लुंगबर्ग

By Admin | Updated: October 18, 2014 00:41 IST2014-10-18T00:41:51+5:302014-10-18T00:41:51+5:30

मुंबई सिटी एफचा प्रमुख खेळाडू असलेल्या फड्र्रिक लुंगबर्ग याने ज्या खेळाने मला भरभरून दिले त्याची परतफेड करण्यासाठी सदैव प्रय}शील राहणार असल्याचे सांगितले.

To contribute to football - Loughpool | फुटबॉलसाठी योगदान द्यायचे आहे - लुंगबर्ग

फुटबॉलसाठी योगदान द्यायचे आहे - लुंगबर्ग

मुंबई : मॉडेल, स्वीडनचा माजी कर्णधार, आर्सेनलचा खेळाडू आणि आता मुंबई सिटी एफचा प्रमुख खेळाडू असलेल्या फड्र्रिक लुंगबर्ग याने ज्या खेळाने मला भरभरून दिले त्याची परतफेड करण्यासाठी सदैव प्रय}शील राहणार असल्याचे सांगितले. दुखापतीमुळे या खेळाडूला मुंबई संघाच्या पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. त्या सामन्याची कसर तो पुढील लढतीत भरून काढेल असा विश्वास त्याला आहे. 
2क्क्1-क्2च्या सत्रत आर्सेनल संघाने ज्यावेळी प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले त्यावेळी लुंगबर्गला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्याने केलेल्या केसांच्या स्टाईलवरही प्रेक्षक फिदा होती. यात त्याने मॉडलिंग क्षेत्रत उडी मारून आपले नाणो आणखी खणखणीत केले. अशा या खेळाडूला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. शुक्रवारी लुंगबर्गने लोकमशी गप्पा मारल्या.  लुंगबर्ग म्हणतो, या खेळासाठी काही तरी करण्याची हिच योग्य वेळ आहे. मी अनेक लीगमध्ये खेळलो आणि त्यांचा कालावधी हा मोठा होता. आयएसएलचाही कालावधी मोठा असायला हवा.  
भारतीय फुटबॉल क्षेत्रला माङयाकडून जेवढी मदत मला करता येईल, ती करण्याची तयारी असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, तळागळापासून लहान मुलांना शिकवण्याची माझी इच्छा आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

 

Web Title: To contribute to football - Loughpool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.