शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

विनेश फोगाटवरून हरियाणात काँग्रेस खेळणार मोठी खेळी? स्वागत यात्रेत बड्या नेत्याच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 16:56 IST

Vinesh Phogat News: मायदेशात परतलेल्या विनेश फोगाट हिच्या स्वागताला तिचे कुटुंबीय, कुस्तीपटू सहकारी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते आणि खासदार दीपेंद्र हुड्डा हेही उपस्थित होते. दरम्यान, दीपेंद्र हुड्डा यांच्या या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या विनेश फोगाट हिने ऐतिहासिक कामगिरी करत कुस्तीमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मुसंडी मारली होती. मात्र अंतिम सामन्याच्या दिवशी निर्धारित वजनापेक्षा १०० ग्रॅम अधिक वजन राहिल्याने विनेश फोगाट हिला स्पर्धेतून बाद करण्यात आले. तसेच तिला पदकापासूनही वंचित करण्यात आले. याविरोधात विनेशने दाद मागितली होती. मात्र तिचं अपील फेटाळलं गेलं. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर आज भारतात दाखल झालेल्या विनेश फोगाट हिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. उल्लेखनीय बाब म्हणजे विनेश हिच्या स्वागताला तिचे कुटुंबीय, कुस्तीपटू सहकारी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते आणि खासदार दीपेंद्र हुड्डा हेही उपस्थित होते. दरम्यान, दीपेंद्र हुड्डा यांच्या या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट हिच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे हरयाणामध्ये सध्या संतापाचं वातावरण आहे. तसेच राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली असल्याने येथील राजकीय घडामोडींवरही या घटनेचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच दीपेंद्र हुड्डा यांचे वडील आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी आमच्याकडे संख्याबळ नाही नाहीतर विनेशला राज्यसभेवर पाठवलं असतं, असं विधान केलं होतं. हुड्डा यांच्या या विधानानंतर सर्वच पक्षांकडून वेगवेगळे दावे केले गेले. तसेच विनेशचे काका महावीर फोगाट यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं होतं.

दरम्यान, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुस्तिपटूंसोबत घडलेल्या घटनांचं भांडवल करून त्याचा राजकीय लाभ मिळवण्याची खेळी काँग्रेसकडून खेळली जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच दीपेंद्र सिंह हुड्डा हे विनेशच्या स्वागतासाठी आवर्जुन उपस्थित राहिले होते. कुस्ती हा हरयाणासाठी प्रतिष्ठेचा विषय असून, मागच्या बृजभूषण सिंह सोबत झालेल्या वादानंतर सातत्याने कुस्तीचा मुद्दा हरियाणामध्ये चर्चेत राहिलेला आहे. या मुद्द्यावरून हरयाणामध्ये भाजपा बॅकफूटवर आहे. त्याचा फायदा घेण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. विनेशच्या माध्यमातून काँग्रेस महिला, तरुणी आणि जाट समाजाला आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात आहे. खाप पंचायतींनीही विनेशला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या सर्व वर्गाला एक सकारात्मक संदेश देऊन मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

दरम्यान, विनेशच्या स्वागतासाठी पोहोचलेल्या दीपेंद्र हुड्डा यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, विश्वविजेत्या कुस्तिपटूला पराभूत करून देशात आलेली देशाची लेक आणि हरयाणाची वाघीण, विनेश फोगाट हिचं भारतामध्ये स्वागत आणि अभिनंदन! रक्षाबंधनाला भाऊ बहिणीला भेट देतो. मात्र तू आम्हा सर्व भारतीयांची छाती अभिमानानं फुलून यावी अशी कामगिरी केली आहेस. तू जीवनातील प्रत्येक कसोटीमध्ये विजयी होत राहा, याच आमच्या शुभेच्छा.  दरम्यान, हरणायाचे क्रीडामंत्री संजय सिंह यांनीबी विनेशला राजकारणात प्रवेश करण्यासाठी निमंत्रित केलं होतं. विनेशची इच्छा असल्यास तिला उमेदवारी देण्याचा विचार भाजपा करू शकतो, असे ते म्हणाले होते. मात्र भाजपा विनेशबाबत उघडपणे काहीही भूमिका घेत नाही आहे. तर विनेशबाबत काँग्रेस राजकारण करत आहे, अशी टीका हरयाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांनी केली होती.  

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीHaryanaहरयाणाcongressकाँग्रेस