्रपोद्दार इंटरनॅशनल अंतिम फेरीत

By Admin | Updated: September 7, 2014 00:04 IST2014-09-07T00:04:11+5:302014-09-07T00:04:11+5:30

शालेय फुटबॉल स्पर्धा : प्रतीक्षा दातारचा निर्णायक गोल

Competitor International in the final round | ्रपोद्दार इंटरनॅशनल अंतिम फेरीत

्रपोद्दार इंटरनॅशनल अंतिम फेरीत

लेय फुटबॉल स्पर्धा : प्रतीक्षा दातारचा निर्णायक गोल
औरंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय फुटबॉल स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या गटात पोद्दार इंटरनॅशनल सीबीएसई संघाने पोद्दार आयसीएसईवर मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला़
स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात पोद्दार सीबीएसईने पोद्दार आयसीएसईवर १-० ने मात करीत फायनलमध्ये प्रवेश केला़ विजयी संघाकडून प्रतीक्षा दातार हिने निर्णायक गोल नोंदविला़ स्पर्धेतील अन्य सामन्यात १७ वर्षांखालील मुलांच्या गटातील सामन्यात तलत हायस्कूलने पोद्दार आयसीएसईिवरुद्ध ४-२ ने विजय मिळविला़ बुर्‍हानी नॅशनल स्कूलने लिटिल स्टार स्कूलवर ३-० ने मात केली़ विजयी संघाकडून मोहंमद अनस याने २ गोल नोंदविले, तर अब्दुल अनस याने १ गोल केला़
होली के़ हायस्कूलने संत मीरा हायस्कूलवर ३-० ने विजय मिळविला़ विजयी संघाकडून सय्यद जुनैद, संवाद, नासेर यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला़ अन्य सामन्यात एसएफएसने बुन इंग्लिश स्कूलवर २-१ ने बाजी मारली़ एसएफएसकडून जुनैद खान याने २ गोल करीत विजयात योगदान दिले़ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Competitor International in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.