धोनीच्या तुलनेत अन्य यष्टिरक्षक आघाडीवर

By Admin | Updated: May 14, 2014 01:55 IST2014-05-13T19:10:56+5:302014-05-14T01:55:05+5:30

आयपीएलच्या सातव्या पर्वात भारतातील अन्य यष्टिरक्षक फलंदाजांनी धोनीच्या तुलनेत वर्चस्व गाजविले आहे. आयपीएलच्या सातव्या पर्वांत अनेक फ्रेंचायसी संघांनी भारतीय यष्टिरक्षक फलंदाजांना प्राधान्य दिले आहे.

In comparison to Dhoni, other wicketkeeper leads | धोनीच्या तुलनेत अन्य यष्टिरक्षक आघाडीवर

धोनीच्या तुलनेत अन्य यष्टिरक्षक आघाडीवर

नवी दिल्ली : चेन्नई सुपरकिंग्जचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीचा जगातील दिग्गज यष्टिरक्षक फलंदाजांमध्ये समावेश आहे. पण आयपीएलच्या सातव्या पर्वात भारतातील अन्य यष्टिरक्षक फलंदाजांनी धोनीच्या तुलनेत वर्चस्व गाजविले आहे.
आयपीएलच्या सातव्या पर्वांत अनेक फ्रेंचायसी संघांनी भारतीय यष्टिरक्षक फलंदाजांना प्राधान्य दिले आहे. दिनेश कार्तिकला दिल्ली डेअरडेव्हिल्सने साडेबारा कोटी रुपयांना करारबद्ध केले. आयपीएलमधील तो दुसरा सर्वांत महागड खेळाडू ठरला आहे. स्पर्धेत सोमवारपर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांतील कामगिरीच्या आधारावर धोनी भारतातील अन्य यष्टिरक्षक फलंदाजांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. धोनीने ९ सामन्यांत केवळ ३ झेल टिपले असून, १६९ धावा फटकाविल्या आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या पार्थिव पटेलने ९ सामन्यांत यष्टिपाठी ११ बळी घेतले आहेत. यष्टिरक्षकांच्या शर्यतीत तो सर्वांत आघाडीवर आहे. पार्थिवने या स्पर्धेत १६२ धावा फटकाविल्या आहेत. गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना रिद्धिमान साहाने ९ सामन्यात ९ बळी घेतले व १०९ धावा फटकाविल्या आहेत.
राजस्थान संघाचा युवा यष्टिरक्षक संजू सॅम्सनने ९ सामन्यात ७ बळी घेतले असून, १९३ धावा फटकाविल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या चिदंबरम गौतमने ८ सामन्यात ६ बळी घेतले असून, ११३ धावा फटकाविण्याची कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या रॉबिन उथप्पाने ९ सामन्यात ६ बळी घेतले असून, ३०२ धावा फटकाविण्याची कामगिरी केली आहे. उथप्पाचे ६ पैकी ५ बळी यष्टिचितचे आहेत. सनरायजर्स हैदराबादच्या नमन ओझाने ६ सामन्यात ५ बळी घेतले असून, ६२ धावा फटकाविल्या आहेत. साडेबारा कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कार्तिकने ४ बळी घेतले असून, २३२ धावा फटकाविल्या आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: In comparison to Dhoni, other wicketkeeper leads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.