शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी ११ वर्षांनंतर पुढील महिन्यापासून होणार सुनावणी, CBI कोर्टाने आरोपींना बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 19:33 IST

राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी ११ वर्षांनंतर पुढील महिन्यापासून सुनावणी होणार आहे. 

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये (CWG) ६०० कोटींहून अधिक घोटाळ्यांच्या प्रकरणाबाबत पुढील महिन्यापासून सुनावणी होणार आहे. सीबीआयने या प्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी आयोजन समितीचे माजी सदस्य आणि इतरांविरुद्ध खटला सुरू होणार आहे. पुढील महिन्यात ही सुनावणी सुरू होणार असून त्यासाठी न्यायालयाने समन्स बजावले आहे.

रविवारी याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी म्हटले, सीबीआयने २५ जानेवारी रोजी आयोजन समितीचे सदस्य एके सक्सेना, राजेंद्र प्रसाद गुप्ता, सुरजित लाल आणि के उदय कुमार रेड्डी यांच्यावर खटला चालवण्यास मान्यता दिल्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली आहे. हे प्रकरण राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तंबू, केबिनच्या पुरवठ्याशी संबंधित आहे, जे कथितरित्या जास्त दराने खरेदी आणि भाड्याने देण्यात आले होते. यामुळे सरकारी तिजोरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 

१४० कोटींचे देण्यात आले होते कंत्राटसीबीआयने आपल्या आरोपपत्रात जीएल मेरीफॉर्मचे तत्कालीन संचालक बिनू नानू, वायुसेनेचे माजी ग्रुप कॅप्टन आणि पुरवठादार प्रवीण बक्षी आणि कम्फर्ट नेट ट्रेडर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक संदीप वाधवा यांची देखील नावे घेतली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे वाधवा कथितपणे नुस्ली इंडिया लिमिटेडशी संबंधित आहेत, ज्यांचे नाव एफआयआरमध्ये आहे. त्यांनीच २०१० च्या राष्ट्रकुल खेळांसाठी तंबू, केबिन यांसारख्या वस्तूंच्या पुरवठ्यासाठी १४० कोटी रुपयांचा करार केला होता.

दरम्यान, सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीचे तत्कालीन महासंचालक व्हीके वर्मा यांचे नाव एफआयआरमध्ये नोंदवले होते, मात्र सध्याच्या आरोपपत्रात त्यांचे नाव नाही. चार कंपन्यांना ६०० कोटींहून अधिक किमतीचे कंत्राट मिळाले होते. सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, अद्याप तपास सुरू असून नावे असलेल्या आरोपींबाबतचा तपास पूर्ण झाला असला तरी पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल.

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाCBIगुन्हा अन्वेषण विभागfraudधोकेबाजी