शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2022 : छोट्या कपड्यावरून समाजाचे टोमणे ऐकले, त्याच निखत जरीनचा 'गोल्डन पंच'!; वडीलांच्या पाठिंब्याने जिंकलं जग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 19:13 IST

Commonwealth Games 2022 Boxing : नितू आणि अमित पांघल यांनी बॉक्सिंगमधील सुवर्णपदकाचे खाते उघडल्यानंतर सर्वांच्या नजरा होत्या त्या निखत जरीनवर ( Nikhat Zareen) हिच्या कामगिरीवर.

Commonwealth Games 2022 Boxing : नितू आणि अमित पांघल यांनी बॉक्सिंगमधील सुवर्णपदकाचे खाते उघडल्यानंतर सर्वांच्या नजरा होत्या त्या निखत जरीनवर ( Nikhat Zareen) हिच्या कामगिरीवर. विश्वविजेत्या निखतसमोर नॉर्दन आयर्लंडच्या कार्ली मॅक नॉलचे आव्हान होते. बचाव व आक्रमण याचा सुरेख संगम राखताना निखतने आयर्लंडच्या बॉक्सरचला चकवले होते. पहिल्या राऊंडमध्ये निखतने वर्चस्व गाजवले होते. सर्व ५ पंचांकडून तिने १०पैकी १० गुण घेतले होते. 

दुसऱ्या राऊंडमध्ये मॅक नॉलने जोरदार पंच मारून सामन्यातील चुरस वाढवली. निखत आपली ऊर्जा वाचवून खेळ करताना दिसली, ती तिसऱ्या राऊंडसाठी सर्व ताकद वाचवून होती. दुसऱ्या राऊंडमध्येही पंचांचा निकाल निखतच्या बाजूनेच होता आणि तिला तिसऱ्या राऊंडमध्ये सातत्य राखून सुवर्णपदकावरील पकड मजबूत करायची होती. निखतने तिच्यापेक्षा ७ वर्ष वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूला थकवून बाजी मारली. या वजनी गटात मेरी कोमने कधीकाळी वर्चस्व गाजवले होते. त्या कॅटेगरीत आता निखत दबदबा सिद्ध करतेय.

विश्वविजेती निखत जरीनने समाजाच्या जुन्या रुढींना चपकार देत बॉक्सर होण्याचा निर्णय घेतला. मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या निखतने तिच्या समाजातील मुलींसमोर एक आदर्श ठेवला आहे.  तिचे वडील मोहंमद जमील स्वत: खेळाडू होते. ते फुटबॉल, क्रिकेट खेळत. त्यांना चार मुली. निखत तिसरी. आपल्या मुलींनीही खेळावं असं त्यांना वाटे. पण बाकी मुलींना खेळाचा ध्यास नव्हता, आवडीपुरता खेळ मर्यादित राहिला. निखतमध्ये मात्र ते पॅशन होतं. 

वयाच्या १४ व्या वर्षी ती वर्ल्ड युथ चॅम्पिअन झाली. खेळत होती. साईचं प्रशिक्षणही मिळालं. उत्तम कोचही लाभले. त्यात घरात तिचे काका बॉक्सर. त्यांची मुलं इथेशामुद्दीन आणि इमीशामुद्दीन दोघे बॉक्सर. निजामाबादच्या या कुटुंबाला खेळाचं वेड होतं. पण तेलंगणातल्या छोट्या शहरात मुलांनी खेळण्याला हरकत नव्हती, मुलींनी खेळाचं मात्र भवताली सर्वांनाच वावडं होतं. त्यात लहान लहान कपडे घालून मुलगी घराबाहेर खेळायला जाते हे तर फारच खूपत होतं. वडील मात्र निखतच्या मागे उभे राहिले.

#Boxing अमित पांघलने ( Amit Panghal) टोक्योतील निराशाजनक कामगिरी मागे टाकून आज कमाल केली. ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अमितने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना इंग्लंडच्या किएरन मॅकडोनाल्डला हतबल केले. पहिला राऊंड अमितने सहज जिंकला, परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये मॅकडोनाल्डने संघर्ष दाखवला. तिसऱ्या राऊंडमध्ये सुरुवातीला डिफेन्सिव्ह खेळ केल्यानंतर अमितने अचानक अखेरच्या ४० सेकंदात जोरदार ठोसे मारले. अमितने ५-० असा विजय मिळवून सुवर्णपदक पक्के केले.  #Boxing बॉक्सिंगमध्ये आजच्या दिवसाचे पहिले सुवर्णपदक आले. भारताच्या नितूने ४८ किलो वजनी गटात इंग्लंडच्या डेमी जेड रेसझ्तानवर ५-० असा विजय मिळवून गोल्ड मेडल जिंकले.  

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाboxingबॉक्सिंग