शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Commonwealth Games 2022 : अन्याय की नियम?, ८.०८ मीटरसह झाली होती टाय, तरीही मुरली श्रीशंकरला दिले रौप्य अन् बहामाच्या खेळाडूला सुवर्ण!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 07:25 IST

Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी मुरली श्रीशंकरने ( Murali Sreeshankar ) लांब उडीत ऐतिहासिक रौप्यपदकाची कमाई केली.

Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी मुरली श्रीशंकरने ( Murali Sreeshankar ) लांब उडीत ऐतिहासिक रौप्यपदकाची कमाई केली. पाचव्या प्रयत्नात श्रीशंकरने ८.०८ मीटर लांब उडी मारून दुसऱ्या स्थानी झेप घेतली. बहामासच्या लॅक्यून नैर्न यानेही दुसऱ्याच प्रयत्नात ८.०८ मीटर लांब उडी मारली होती. त्यामुळे सहाव्या प्रयत्नात सुवर्ण झेप कोण घेतो याची उत्सुकता होती. भारताच्या श्रीशंकरचा प्रयत्न अयशस्वी ठरला, तर नैर्नने ७.९८ मीटर लांब उडी मारली. आता दोन्ही खेळाडू ८.०८ मीटरसह संयुक्तपणे अव्वल क्रमांकावर होते, परंतु सुवर्णपदक हे बहामासच्या खेळाडूला दिले गेले. श्रीशंकरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जाणून घ्या कारण?श्रीशंकरने पहिल्या तीन प्रयत्नांत ७.६० मी. ७.८४ मी. व ७.८४ मी. अशी लांब उडी मारली. भारताच्याच  मुहम्मद अनीस याहिया ( Muhammed Anees Yahiya) याने सहाव्या प्रयत्नात ७.९७ मीटर लांब उडी मारून सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसह पाचवे स्थान पटकावले. श्रीशंकरला चौथ्या प्रयत्नात -१ सेंटीमीटरमुळे ८ मीटरची लांब उडी अवैध ठरवण्यात आली. तो निराश झाला, परंतु खचला नाही. पाचव्या प्रयत्नात ८.०८ मीटर  लांब उडी मारून सहाव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडीत भारताच्या दोन महिलांनी पदक जिंकले होते, पण पुरुषांमध्ये रौप्यपदक जिंकणारा श्रीशंकर हा पहिलाच भारतीय ठरला. 

नियम काय सांगतो?श्रीशंकर व नैर्न यांनी समसमान ८.०८ मीटर लांब उडी मारली. अशा परिस्थितीत खेळाडूंची दुसरी सर्वोत्तम उडी ग्राह्य धरून पदकाचा दावेदार ठरवला जातो. यावेळी नैर्नची दुसरी सर्वोत्तम उडी ही ७.९८ मीटर ही आहे आणि श्रीशंकरची ७.८४ मीटर... त्यामुळे श्रीशंकरला रौप्यपदक देण्यात आले.  

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ