Commonwealth Games 2022 : ०.७३ सेकंदाच्या फरकाने हुकलं पदक; हिमा दास, द्युती चंद या जीव तोडून धावल्या, पण... Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 05:56 PM2022-08-07T17:56:48+5:302022-08-07T17:57:15+5:30

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी बॉक्सर्सनी सुवर्ण'पंच'लगावला. नितू व अमित पांघल यांनी सुवर्णपदक पटकावल्यानंतर अ‍ॅथलेटिक्समध्ये पदकांचा पाऊस पडला.

Commonwealth Games 2022 : Indian Women's 4x100m relay team of Dutee-Hima-Srabani-Jyothi clock 43.81s to finish 5th, Video | Commonwealth Games 2022 : ०.७३ सेकंदाच्या फरकाने हुकलं पदक; हिमा दास, द्युती चंद या जीव तोडून धावल्या, पण... Video 

Commonwealth Games 2022 : ०.७३ सेकंदाच्या फरकाने हुकलं पदक; हिमा दास, द्युती चंद या जीव तोडून धावल्या, पण... Video 

Next

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी बॉक्सर्सनी सुवर्ण'पंच'लगावला. नितू व अमित पांघल यांनी सुवर्णपदक पटकावल्यानंतर अ‍ॅथलेटिक्समध्ये पदकांचा पाऊस पडला. पुरुषांच्या तिहेरी उडीत एलडोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकेर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. पुरुषांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारने ( Sandeep Kumar) सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद करून कांस्यपदक जिंकले. त्यात महिलांच्या भालाफेकीत अन्नू राणीने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर ४ बाय ४०० मीटर रिलेच्या अंतिम फेरीत हिमा दास व दृती चंद यांच्या टीमवर लक्ष होते.


#Women's Javelin Throw महिलांच्या भालाफेकीत उत्तरप्रदेशच्या अन्नू राणीने कांस्यपदकाची कमाई केली. तिने चौथ्या प्रयत्नात ६० मीटर फेकलेला भाला हा पदकासाठी पुरेसा ठरला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या ( २०१९ दोहा) अंतिम फेरीत पात्र ठरणारी ती भारताची पहिली महिला भालाफेकपटू ठरली होती. 

#Men's 10,000m Race Walk Final पुरुषांच्या अंतिम सामन्यात संदीप कुमार ( Sandeep Kumar) याने  38:49.21 मिनिटे अशी वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले.

#Triple Jump  अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत एलडोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकेर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. पॉलने १७.०३ मीटर, तर अब्दुल्लाने १७.०२ मीटर लांब तिहेरी उडी मारली.  

#Women's 4 x 100m Relay फायनलमध्ये दृती चंद, हिमा दास, सराबनी नंदा व ज्योती याराजी यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. पण, शर्थीचे प्रयत्न करूनही या संघाला ४३.८१ सेकंदाच्या वेळेसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नायजेरियाने ४२.१० सेकंदासह सुवर्ण, इंग्लंडने ४२.४१ सेकंदासह रौप्य व जमैकाने ४३.०८ सेकंदासह कांस्यपदक जिंकले.

 

Web Title: Commonwealth Games 2022 : Indian Women's 4x100m relay team of Dutee-Hima-Srabani-Jyothi clock 43.81s to finish 5th, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.