शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये हाणामारी; हॉकी स्टिक लागल्याने वाद, एकाने पकडला दुसऱ्याचा गळा: Video व्हायरल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 12:28 IST

England vs Canada hockey Match: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी खेळाडूंमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी खेळाडूंनी एकमेकांचे टी-शर्टही खेचले.

England vs Canada hockey Match:इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी (4 ऑगस्ट) हॉकी सामन्यात खेळाडूंमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. प्रकरण एवढे वाढले की, एका खेळाडूने दुसऱ्याचा गळा पकडला. यावेळी त्या दोघांनी एकमेकांचे टी-शर्टही खेचले. अखेर इतर खेळाडून आणि रेफरीच्या मध्यस्थीने वाद मिटला.

सामना यजमान इंग्लंड आणि कॅनडा यांच्यात सुरू होता. इंग्लंडने हा सामना 11-2 अशा फरकाने जिंकला. सध्या यजमान इंग्लंड गटात दुसऱ्या क्रमांकावर आणि भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. आता उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल तर भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडसोबत होईल.

सामन्यात नेमकं काय झालं?हाफ टाईमचा बिगुल वाजण्याच्या काही मिनिटे आधी हा वाद झाला. इंग्लंडने 4-1 अशी आघाडी घेतली होती आणि कॅनडाचा संघ गोलसाठी सातत्याने आक्रमक वृत्ती स्वीकारत होता. दरम्यान, चेंडू हिसकावण्यासाठी कॅनडाचा बलराज पानेसर आणि इंग्लंडचा ख्रिस ग्रिफिथ यांच्यात चुरशीची लढत झाली.

रेड-यलो कार्ड देण्यात आलेयादरम्यान खेळताना बलराजची हॉकी स्टिक ग्रिफिथच्या हातावर अडकली. यामुळे संतापलेल्या इंग्लिश खेळाडूने पानेसरला धक्काबुक्की केली. मग दोन्ही खेळाडू भडकले आणि पानेसरने ग्रिफिथचा गळा पकडला. यानंतर हॉकीचा सामना रणांगणात बदलला. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे टी-शर्टही पकडून ओढले. यावेळी दोन्ही संघांचे खेळाडू आणि रेफरी आले. प्रकरण वाढण्याआधी किंवा मारामारी होण्यापूर्वीच त्यांनी हस्तक्षेप केला आणि वाद मिटवला. यावेळी रेफरीने पानेसरला लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले तर ग्रिफिथला पिवळे कार्ड दाखवून इशारा देण्यात आला.

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाHockeyहॉकीEnglandइंग्लंडCanadaकॅनडा