शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

Commonwealth Games 2018 : ट्रक चालकाच्या मुलाने जिंकले पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:00 IST

२५ वर्षीय गुरुराजा हा भारतीय हवाई दलाचा कर्मचारी असून कर्नाटकचा रहिवासी आहे. त्याचे वडील ट्रकचालक असून अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी गुरुराजाला मोठे केले.

२५ वर्षीय गुरुराजा हा भारतीय हवाई दलाचा कर्मचारी असून कर्नाटकचा रहिवासी आहे. त्याचे वडील ट्रकचालक असून अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी गुरुराजाला मोठे केले. रौप्य जिंकल्यानंतर गुरुराजाने वैद्यकीय पथक सोबत नसल्याचा पुनरुच्चार केला. फिजिओथेरपिस्ट नसल्यामुळे मला योग्य प्रकारे उपचार घेता आला नाही, असे त्याने म्हटले. क्रीडा मंत्रालयाच्या नियमांमुळे भारतीय पथकाला पुरेसे वैद्यकीय पथक आणि अन्य सहकारी आॅस्ट्रेलियाला नेता आले नाहीत. तीन पैकी पहिल्या दोन प्रयत्नात गुरुराजाला अपयश आले.स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकल्या गेलेल्या गुरुराजाला प्रशिक्षकांनी मोलाची सूचना केली. ‘तुझ्या एका प्रयत्नावर संपूर्ण कारकिर्द कशी असेल हे ठरणार आहे.’ यानंतर त्याच्या मनात देशाचा व कुटुंबाचा विचार आला. रौप्य जिंकल्यानंतर गुरुराजाने म्हटले की, ‘देशवासीयांना निराश करायचे नाही, या निर्धारासह व्यासपीठावर आलो आणि १३८ किलो वजन उचलून पदकावर नाव कोरले.’ तसेच, ‘२०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुशील कुमारला कुस्ती खेळताना पाहिले. मलाही कुस्ती खेळायची होती. मात्र प्रशिक्षक राजेंद्र यांनी मला वेटलिफ्टींगकडे वळवले,’ असेही गुरुराजाने म्हटले.गुरुराजाला रौप्य पदक !मीराबाई चानूच्यासुवर्ण यशाचा जल्लोष होण्याआधी २५ वर्षांचा पी. गुरुराजा याने पुरुषांच्या ५६ किलो वजन गटात पदार्पणात २४९ किलो वजन (१११ आणि १३८) उचलून रौप्यपदकाची कमाई केली. गुरुराजा स्नॅचमध्ये १११ किलो वजन उचलल्यानंतर तिसऱ्या स्थानावर होता. क्लीन अ‍ॅण्ड जर्क प्रकारातील पहिल्या दोन प्रयत्नांत तो अपयशी ठरला, पण तिसºया प्रयत्नांत १३८ किलो वजन उचलून पदक निश्चित केले.मनासारखी कामगिरी झाली नाही‘राष्टÑकुल स्पर्धेतील हे माझे पहिलेच पदक असून अपेक्षित कामगिरी झाली नाही. माझी उत्कृष्ट कामगिरी १५५-५६ किलोंची आहे. मी १५५-५६ किलोंपेक्षा जास्त वजन उचलू शकेन, असे वाटत होते; पण शरीराने साथ दिली नाही. माझ्यावर कोणतेही मानसिक दडपण नव्हते. येथील वातावरणही पोषक आहे. आंतरराष्टÑीय स्पर्धेतील हे माझे चौथे पदक आहे,’ असे गुरुराजाने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Sportsक्रीडा