आ. कृ. वाघमारे, शासकीय विद्यानिकेतन संघ विजयी

By Admin | Updated: September 1, 2014 23:27 IST2014-09-01T23:27:31+5:302014-09-01T23:27:31+5:30

औरंगाबाद : जिल्हा संघटनेतर्फे आयोजित आंतरशालेय खो-खो स्पर्धेत आ. कृ. वाघमारे, शासकीय विद्यानिकेतन आणि वेणूताई चव्हाण प्रशालेने विजय मिळवला.

Come on. Krus Waghmare, Government Vidyankitan Sangit won | आ. कृ. वाघमारे, शासकीय विद्यानिकेतन संघ विजयी

आ. कृ. वाघमारे, शासकीय विद्यानिकेतन संघ विजयी

ंगाबाद : जिल्हा संघटनेतर्फे आयोजित आंतरशालेय खो-खो स्पर्धेत आ. कृ. वाघमारे, शासकीय विद्यानिकेतन आणि वेणूताई चव्हाण प्रशालेने विजय मिळवला.
पहिल्या लढतीत पवन काथार, नीलेश जडीतकर, जयेश यांच्या कामगिरीच्या बळावर आ. क्र. वाघमारे संघाने राजा शिवाजी विद्यालयाचा पराभव केला. राजा शिवाजी विद्यालयातर्फे राहुल पवार, तुषार थोरात यांनी एकाकी झुंज दिली.
दुसर्‍या सामन्यात वेणूताई चव्हाण प्रशालेने स्वामी विवेकानंद अकॅडमीचा ५ गुणांनी पराभव केला. प्राजंली मालोदे, शिवानी जाधव, शीतल जमादार, सुजाता खरात यांनी निर्णायक कामगिरी केली. स्वामी विवेकानंदतर्फे प्रीती दौड, भक्ती वैद्य, निकिता चौकासे यांनी प्रभावी खेळ केला. तिसर्‍या सामन्यात शासकीय विद्यानिकेतनने राजा शिवाजी विद्यालयावर मात केली. विजयी संघातर्फे सागर महाले, देविलाल पाडवी यांनी निर्णायक कामगिरी केली. पराभूत संघाकडून किरण कुळधर आणि राहुल पवारने एकाकी झुंज दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोविंद शर्मा, उदय पंड्या, कैलास पटणे, दीपक सपकाळ, संजय मुंढे, आशिष भगत, श्रीपाद लोहकरे, शुभम सुरळे, मनोज गायकवाड, विनायक राऊत आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Come on. Krus Waghmare, Government Vidyankitan Sangit won