कॉलम

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:32+5:302015-02-11T00:33:32+5:30

न्यूझीलंडविरुद्ध अन्य संघांना सावध रहावे लागेल

Columns | कॉलम

कॉलम

यूझीलंडविरुद्ध अन्य संघांना सावध रहावे लागेल
हर्षा भोगले कॉलम...
माझ्या संपर्कातील सर्व जाणकार न्यूझीलंडला विजेतेपदाचा दावेदार मानत आहेत. यावेळी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या संघांनंतर न्यूझीलंडला विजेतेपदाची पंसती देण्यात येत आहे. न्यूझीलंड संघाने यापूर्वीही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याची कामगिरी केली आहे, पण त्यांना जेतेपदासाठी कधीच पसंती दर्शविण्यात आलेली नाही. यावेळी मात्र या संघांत असे काय आहे ? याबाबत आपण विचार करू.
तीन चांगले फलंदाज, एक दर्जेदार गोलंदाजी अष्टपैलू, शानदार यष्टिरक्षक, एक अनुभवी फिरकीपटू आणि विविधता असलेले आक्रमक वेगवान गोलंदाजी आकमण कुठल्याही संघाला तुल्यबळ ठरविण्यास सक्षम आहे. त्याचसोबत या संघाला मायदेशातील वातावरणात खेळण्याचा लाभ मिळणार आहे. पण, न्यूझीलंड संघ यावेळी अपेक्षांचे दडपण पेलण्यास सक्षम आहे का? कारण या संघाला अपेक्षांचे ओझे पेलण्याची सवय नाही. धक्कादायक निकाल नोंदविण्याची क्षमता असलेला संघ म्हणून नैसर्गिक खेळ करण्याचे स्वातंत्र्य असते, पण दावेदार असल्यानंतर तुमच्यावर अपेक्षांचे ओझे असते. आगामी विश्वकप स्पर्धेत न्यूझीलंडच्या कामगिरीबाबत उत्सुकता राहील.
केन विलियम्सन सध्या स्टार आहे. काही प्रमाणात तो हशिम अमलाप्रमाणे आहे, असे वक्तव्य करणे धाडसाचे ठरेल, पण अलीकडच्या कालावधीत मात्र विलियम्सनला अपयशाची चव चाखावी लागली नाही, हे मात्र खरे आहे. ब्रॅन्डन मॅक्युलम व रॉस टेलरच्या साथीने विलियम्सनच्या समावेशामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजीला बळकटी मिळाली आहे. मार्टिन गुप्तील मॅच विनर असून कोरी ॲन्डरसन व ल्युक रोंची यांच्या समावेशामुळे मधल्या व तळाच्या फळीला बळकटी मिळाली आहे. त्यांच्या जोडीला अचूक मारा करण्याची क्षमता असलेला फिरकीपटू डॅनियल व्हेटोरी आहे. त्यामुळे न्यूझीलंडला वेगवान गोलंदाजीमध्ये पर्याय वापरण्याची संधी मिळणार आहे. न्यूझीलंड संघात ट्रेंट बोल्ट व मिच मॅकक्लेनेघन त्याचप्रमाणे टीम साऊदी व केली मिल्स यांच्या समावेशामुळे गोलंदाजीमध्ये विविधता आहे. त्याचप्रमाणे ॲडम मिलनेच्या समावेशामुळे गोलंदाजी आक्रमणामध्ये विविधता आली आहे.

Web Title: Columns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.